दोन अपघातांत दोन ठार; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:07 AM2019-06-23T00:07:30+5:302019-06-23T00:07:35+5:30

जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन ठार, तर चौघे जखमी झाले आहेत.

Two killed in two accidents; Four injured | दोन अपघातांत दोन ठार; चार जखमी

दोन अपघातांत दोन ठार; चार जखमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड / केज : जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन ठार, तर चौघे जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही अपघातांमध्ये कारने दुचाकीला धडक दिली आहे.
हिंगणी फाट्याजवळ अपघात
बीड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील हिंगणी फाटा येथे भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील अर्जुन जयवंतराव काळे (५१, रा. राक्षसभुवन शनिचे ता. गेवराई) यांचा मृत्यू झाला असून अंकुश भानुदास ढोबळे (४०, रा. मांडुळा ता. गेवराई), परमेश्वर चव्हाण यांचा जखमीत समावेश आहे. ही घटना शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास दरम्यान घडली.
काळे हे जयभवानी शिक्षण प्रसारक संस्थेच्या राक्षसभुवन (ता. गेवराई) येथील विद्यालयात लिपिक पदावर कार्यरत होते. ढोबळे हे दैठण (ता. गेवराई) येथील जयभवानी विद्यालयात शिक्षक असून मांडुळा गावचे विद्यमान सरपंच आहेत. कार्यालयीन कामासाठी ते दोघे दुचाकीवर (एमएच २३ एपी-२०८४) बीडला आले होते. काम पूर्ण करून ते गेवराईकडे परत होते. त्यांची दुचाकी हिंगणी फाट्यावर आली. त्याच वेळी औरंगाबादहून बीडकडे जाणाऱ्या कारने (एमएच ११ एडब्ल्यू-५५५५) जोराची धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरीलस्वार लांब फेकले गेले व यामध्ये अर्जुन काळे हे जागीच ठार झाले तर अंकुश ढोबळे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना परिसरातील नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर ढोबळेंना अधिक उपचारासाठी खासगी दवाखान्यात हलविले आहे. या घटनेनंतर जयभवानी शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.
विठ्ठल वस्तीजवळ अपघात
केज : धारुरहून केजकडे येत असलेल्या मोटारसायकलला धारुरकडे भरधाव वेगाने जाणाºया कारने समोरुन जोरात धडक दिली. झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील एक जागीच ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालकाने कारसह घटनास्थळाहुन पोबारा केला. सदर अपघात शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला आहे.
तालुक्यातील जवळबन येथील शरद सुभाष भाकरे (३८), भाऊसाहेब विठ्ठल करपे (३५) व अनिल राजेभाऊ करपे (३२) हे तिघे काही कामा निमित्त धारुरला गेले होते. धारुरहून सायंकाळी पाचच्या सुमारास गावाकडे दुचाकीवरुन टिबलसीट जात असताना केजहून धारुरकडे भरधाव जात असलेल्या कारने तांबवा येथील विठ्ठल वस्तीजवळ समोरुन जोरात धडक दिली. यात दुचाकीच्या पुढच्या चाकाचे तुकडे तुकडे होत गाडीचा चक्काचूर झाला. दुचाकीवरील अनिल करपे हे जागीच ठार झाला तर शरद भाकरे व भाऊसाहेब करपे हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेतून त्यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर डॉ. लांडगे यांनी प्राथमिक उपचार केले.
जखमीची अवस्था चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलविल्याची माहिती डॉ. लांडगे यांनी दिली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
कार चालकाचा पोबारा
हा अपघात केजपासून सात किलोमीटर अंतरावरील विठ्ठल वस्तीवर झाला. घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असता हा अपघात रस्त्याच्या मधोमध झाल्याचे दिसून आले. अपघात पाहणाºयांनी सांगितले की, अपघातानंतर कार चालकाने बाहेर डोकावून पाहत कार भरधाव वेगाने धारुरकडे नेली.

Web Title: Two killed in two accidents; Four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.