बीडमध्ये दोन लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:23 AM2017-12-29T00:23:48+5:302017-12-29T00:25:57+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार बीड जिल्ह्यात ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत जारी झालेल्या तीन ग्रीनलिस्टनुसार ८९ हजार शेतक-यांना ४३० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. त्यानंतर ७८ कोटी रुपये मंजूर झाले. तरीदेखील अद्याप २ लाखाहून जास्त शेतक-यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार जिल्ह्यात ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत जारी झालेल्या तीन ग्रीनलिस्टनुसार ८९ हजार शेतक-यांना ४३० कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. त्यानंतर ७८ कोटी रुपये मंजूर झाले. तरीदेखील अद्याप २ लाखाहून जास्त शेतक-यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे.
शेतक-यांना कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर शासन निर्णयानुसार निकषपात्र शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. आवश्यक माहिती बॅँकांनी शासनाकडे पाठविली. निकषानुसार पात्र ठरलेली शेतकरी संख्या ३ लाख ७ हजार ६४ इतकी निश्चित झाली. ६ डिसेंबरपर्यंतच्या तीन टप्प्यात ८९ हजार २८३ शेतकºयांना ४३० कोटी ५० लाख रुपये कर्जमाफी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ४० हजार १८८ शेतकºयांचा समावेश होता. तर उर्वरित शेतकरी इतर राष्टÑीयकृत बॅँकांचे कर्जदार आहेत.
दरम्यान ११ डिसेंबरपर्यंत ४६२ कोटी १५ लाख रुपये शेतकरी कर्जमाफीसाठी प्राप्त झालेले असून ७५ हजार ९०९ शेतकºयांच्या बॅँक खात्यात ३३४ कोटी ४७ लाख रुपये जमा झाले. त्यानंतर ७८ कोटी रुपये आणखी मंजूर झाल्याचे समजते. आतापर्यंत ५०८ कोटी रुपये कर्जमाफीपोटी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत.
३८० कोटी रुपयांचे वाटप
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत बीड जिल्ह्यातील पात्र शेतकºयांना ५०८ कोटी रुपये मंजूर झाले असून ३८० कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ही रक्कम पात्र शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही संबंधित बॅँकांकडून सुरु आहे.
- विजय चव्हाण
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅँक, बीड.
पात्र शेतक-यांचे सर्व निकष
तपासण्याच्या सूचना शासनस्तरावर वारंवार मिळत असून बॅँकांना सर्व माहिती अपलोड करण्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्व राष्टÑीयकृत बॅँका व जिल्हा बॅँकेचे लेखापरिक्षण पूर्ण झालेले असल्याने बॅँकांकडूनही माहिती पोहचविली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘पाचव्या ग्रीनलिस्ट’कडे शेतक-यांचे लक्ष
दरम्यान या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबाचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करणे, नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
प्रोत्साहन योजनेसाठी जिल्हा बॅँकेचे ३५ हजार सभासद पात्र असून हा निधी ९२ लाखांपर्यंत असल्याचे सुत्रांनी सांगितले.
कर्जमाफीची प्रक्रिया अत्यंत संथ होत आहे तर ही प्रक्रिया गतीने करण्यासाठी शासनाकडून वारंवार सूचना मिळत आहेत.
अद्यापही २ लाखाहून जास्त शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. पाचव्या ग्रीनलिस्टची ते वाट पाहत आहेत.