खवा व्यापाऱ्याची जीप अडवून दोन लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:37 AM2021-09-06T04:37:49+5:302021-09-06T04:37:49+5:30

बीड : शहराजवळील बहिरवाडी शिवारातून जाणाऱ्या बाह्यवळण मार्गावर खवा व्यापाऱ्याच्या जीपला कार आडवी लावून दोन लाख रुपयांची रोकड लंपास ...

Two lakh was looted by stopping the jeep of a khawa trader | खवा व्यापाऱ्याची जीप अडवून दोन लाख लुटले

खवा व्यापाऱ्याची जीप अडवून दोन लाख लुटले

Next

बीड : शहराजवळील बहिरवाडी शिवारातून जाणाऱ्या बाह्यवळण मार्गावर खवा व्यापाऱ्याच्या जीपला कार आडवी लावून दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेने रात्रीतून तपासचक्रे गतिमान करत टोळीचा पर्दाफाश केला. पाच आरोपींच्या पुण्यात मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

केज तालुक्यातील विशाल डेअरीचा खवा व केक विक्री करून व्यवस्थापक अनिरुद्ध संभाजी मुळे (२५) व चालक हे दोघे जीपमधून (एमएच १४ एचयू-८०८६) केजकडे परतत होते. त्यांची जीप बीडजवळील बाह्यवळण मार्गावरील बहिरवाडी शिवारात आली तेव्हा ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता अचानक एका पांढऱ्या कारने ओव्हरटेक केले. जीपला कार आडवी लावली. जीपमधून उतरलेल्या तिघांनी थेट चालकाकडे धाव घेत गाडीची तपासणी करायची आहे, असे सांगून दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चालक व व्यवस्थापक अनिरुद्ध मुळे यांना गाडीखाली उतरवले. चालकाच्या केबिनमध्ये ठेवलेली एक लाख ९५ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग उचलून कारमध्ये टाकून ते निघून गेले. कारमध्ये एक चालक व अन्य व्यक्ती होता. कार सुसाट मांजरसुंब्याच्या दिशेने निघून गेली. दरम्यान, घाबरलेल्या अनिरुद्ध मुळे व चालकाने एक किमीपर्यंत पाठलाग केला, पण कार दिसेनाशी झाल्याने त्यांनी पाठलाग करणे सोडून दिले व तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक दीपक राेठे, हवालदार जयसिंग वाघ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुळे यांच्या तक्रारीवरून कलम ३९२ नुसार अनोळखींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून उपनिरीक्षक पवन राजपूत तपास करत आहेत.

...

फुटेजवरून माग

बीड ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा पाडळसिंगीपासून कार जीपचा पाठलाग करत होती, असे निष्पन्न झाले. कारला समोर क्रमांक होता, पण पाठीमागे नंबरप्लेट नव्हती, त्यावरून पूर्वनियोजित कट करून त्यांनी ही लूट केल्याचे उघड झाले. ते पुण्याकडे पळाल्याचेे स्पष्ट झाल्यावर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी पथक रवाना केले.

...

पाच जणांना घेऊन पथक बीडकडे

गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत व सहकाऱ्यांच्या पथकाने रात्रीतून पुणे येथून तिघांना उचलले. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी अन्य दोघांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली कार तसेच लुटलेली रोकड असा मुद्देमाल घेऊन पथक दुपारनंतर बीडकडे रवाना झाले. गुन्ह्याचा थरार तसेच या टोळीचे कारनामे तपासातच पुढे येतील.

....

...

Web Title: Two lakh was looted by stopping the jeep of a khawa trader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.