शेतात बकरी चारणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 17:01 IST2023-06-13T17:00:56+5:302023-06-13T17:01:46+5:30
तीन तरुणांच्या विरोधात पोस्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल

शेतात बकरी चारणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
माजलगाव : तालुक्यातील एका गावात शेतामध्ये बकऱ्या चारणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला. ही घटना शनिवार व रविवार रोजी तालुक्यातील एका गावात घडली आहे. दरम्यान, पीडितेच्या फिर्यादीवरून तिघा जणांविरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन अल्पवयीन मुली तालुक्यातील एका गावच्या शेजारी असणाऱ्या शेतात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान शेळ्या चारत होत्या. यावेळी तिघे जण मोटरसायकवरुन तेथे आले. दोघांनी अल्पवयीन मुलींना बळजबरीने बाजूच्या उसामध्ये नेऊन अत्याचार केला. त्यानंतर रविवारी देखील एका मुलीवर तिघांपैक्की एका आरोपींने धमकावून अत्याचार केला.
दरम्यान पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून विकास बरडे ,करण माळी व केशव राऊत या तिघांजनाविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तीनही आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड हे करत आहेत.