भोंदूगिरी प्रकरणात दोन फरार आरोपींचा तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:33 AM2019-06-21T00:33:09+5:302019-06-21T00:33:46+5:30

घरातील सोने काढून देण्याच्या बहाण्याने कामखेडा येथील एका साठ वर्षीय वृद्धेस लुटल्याचा प्रकर बुधवारी उघडकीस आला होता. याप्रकरणी एका भोंदू महिलेस अटक करण्यात आली असून इतर दोन ओरपी महिलांचा शोध सुरु आहे.

Two more absconding accused in the Bhonduagiri case are investigating | भोंदूगिरी प्रकरणात दोन फरार आरोपींचा तपास सुरू

भोंदूगिरी प्रकरणात दोन फरार आरोपींचा तपास सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : घरातील सोने काढून देण्याच्या बहाण्याने कामखेडा येथील एका साठ वर्षीय वृद्धेस लुटल्याचा प्रकर बुधवारी उघडकीस आला होता. याप्रकरणी एका भोंदू महिलेस अटक करण्यात आली असून इतर दोन ओरपी महिलांचा शोध सुरु आहे. दरम्यान, कामखेडा येथील प्रकरण उघड झाल्यानंतर आतापर्यंत पाच जणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. तसेच अधिक तपास झाल्यानंतर किती जणांना गंडा घातला आहे, हे समोर येईल
बीड तालुक्यातील कामखेडा येथील रहिवासी मन्नाबी उर्फ खलीदाबी सिराज शेख या साठ वर्षीय (६०, रा.कामखेडा, ता.बीड) यांच्या मुलाला दारुचे व्यसन आहे. दीड महिन्यांपूर्वी शेजारी राहणाऱ्या शेख ईशादबी अहेमद व सामीदाबी शेख बशीर (दोघी रा.कामखेडा) यांनी मन्नाबी यांना बीड शहरातील तेलगाव नाका येथील शेख नाजिया शेख पाशा ही मांत्रीक महिला असून ती दारु सोडवण्याचे औषध देते, तिला भेटायला जावे लागेल, असे सांगितल. त्यानुसार मन्नाबी यांनी शेख बीड शहरातील तेलगाव नाक्यावरील नाजिया शेख हिची तिच्या घरी भेट घेण्यासाठी गेल्या होत्या.
त्यानंतर नाजिया हिने मन्नाबी यांच्या घरात २२ किलो सोने असून ते काढण्यासाठी पैशाची मागणी केली होती. व मन्नाबी यांनी पैसे दिल्यानंतर सोने काढून देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे मन्नाबी यांना कळल्यानंतर त्यांनी नाजिया यांच्याकडे पैसे मागितले. शेख नाजिया हिने पैसे देण्यास नकार दिली. हे सर्व पैसे फिर्यादी मन्नाबी यांनी नातेवाईकांकडून घेतले होते.
याप्रकरणी शेख नाजिया शेख पाशा (रा.तेलगाव नाका, बीड), ईशादबी शेख अहेमद व सामेदाबी शेख बशीर (दोघी रा.कामखेडा) यांच्या विरुद्ध बीड ग्रामीण ठाण्यात जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख नाजिया ही अटकेत असून तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दरम्यान, शेख नाजिया हिने गुप्तधनाचे आमिष दाखवून आणखी किती जणांना गंडा घातला याची चौकशी सुरु असून, यांच्यासोबत आणखी कोणी अशा प्रकारामध्ये सहभागी आहे याचा देखील शोध घेतला जात आहे, असे सहायक निरीक्षक सुजित बडे यांनी सांगितले.
भोंदू नाजियाची कसून चौकशी सुरु
अनेक जण भोंदूगिरीच्या विळख्यात अडकतात व आपली फसवणूक करुन घेतता, मन्नाबी सारख्या इतर कोणाकोणाला गंडा घातला आहे याची माहिती काढण्यासाठी शेख नाजिया हीची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.
मात्र, भोंदू नाजियासोबत इतर दोघींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या देखील फसल्या आहेत का?, खरेच या गुन्ह्याशी त्याचा संबंध आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
चौकशीनंतर व तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया सहायक निरीक्षक सुजित बडे यांनी दिली.

Web Title: Two more absconding accused in the Bhonduagiri case are investigating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.