शुभकल्याण मल्टीस्टेटवर आणखी दोन गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:53 AM2019-01-05T00:53:13+5:302019-01-05T00:56:16+5:30

विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून दोन ठेवीदारांचे मुदत ठेवीच्या स्वरूपातील एकूण साडेआठ लाखांची रक्कम हडप केल्याप्रकरणी शुभकल्याण मल्टीस्टेटच्या संचालक मंडळावर न्यायालयाच्या आदेशाने अंबाजोगाई शहर पोलिसात आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

Two more cases have been filed at Shubhakalyan Multistate | शुभकल्याण मल्टीस्टेटवर आणखी दोन गुन्हे दाखल

शुभकल्याण मल्टीस्टेटवर आणखी दोन गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देअंबाजोगाईत दोन ठेवीदारांचे साडेआठ लाख रुपये हडपले

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून दोन ठेवीदारांचे मुदत ठेवीच्या स्वरूपातील एकूण साडेआठ लाखांची रक्कम हडप केल्याप्रकरणी शुभकल्याण मल्टीस्टेटच्या संचालक मंडळावर न्यायालयाच्या आदेशाने अंबाजोगाई शहर पोलिसात आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना लुबाडल्या प्रकरणी ‘शुभकल्याण’वर यापूर्वीच जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे नोंद झाले आहेत. अद्यापही गुन्हे दाखल करण्याचे सत्र थांबलेच नसून फसवणुकीची आणखी प्रकरणे समोर येत आहेत. शुभकल्याणद्वारा विविध प्रसार माध्यमातून करण्यात आलेल्या आकर्षक व्याजदराच्या जाहिरातीला भुलून अंकुश सोपानराव जोगडे यांनी ५ लाख ७ हजार १०२ रुपयांच्या तर संतोष रामराव पौळ (दोघेही रा. पंचायत समिती पाठीमागे, अंबाजोगाई) यांनी ३ लाख ६३ हजार २१७ रुपये ठेवींच्या स्वरुपात शुभकल्याणमध्ये गुंतविले होते. परंतु, मुदत उलटूनही त्यांना ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येऊ लागली. त्यानंतर मल्टीस्टेटच्या व्यवस्थापकाने बँक बंद पडली असून तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे म्हणून हात वर केले. त्यामुळे दोन्ही ठेवीदारांनी अंबाजोगाई शहर पोलिसात धाव घेतली. परंतु, कथित राजकीय दबावापोटी पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

Web Title: Two more cases have been filed at Shubhakalyan Multistate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.