दोन कुख्यात गुन्हेगार एक वर्षासाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:34 AM2021-04-27T04:34:16+5:302021-04-27T04:34:16+5:30

बीड : घरफोड्या, वाटमाऱ्या, चोऱ्या हे गुन्हे करून दहशत पसरवणाऱ्या दोन कुख्यात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने बीड व जालना ...

Two notorious criminals deported for a year | दोन कुख्यात गुन्हेगार एक वर्षासाठी हद्दपार

दोन कुख्यात गुन्हेगार एक वर्षासाठी हद्दपार

Next

बीड : घरफोड्या, वाटमाऱ्या, चोऱ्या हे गुन्हे करून दहशत पसरवणाऱ्या दोन कुख्यात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने बीड व जालना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याची कारवाई २३ एप्रिल रोजी केली होती. या दोन्ही गुन्हेगारांना बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ एप्रिल रोजी पहाटे अटक केली.

सागर उर्फ दत्ता आनंद बाप्ते (रा. चिंतेश्वर गल्ली, गेवराई), आकाश उर्फ बाबू श्रीराम जाधव (२२, रा. शिवाजीनगर, गेवराई) या दोघांवर चोऱ्या, घरफोड्या व रस्ता लुटीचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी कलम ५५ नुसार त्या दोघांना बीड व जालना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. २३ एप्रिल २०२१ रोजी भारत राऊत यांनी हे आदेश काढले होते.

दरम्यान, रविवारी पहाटे साडेपाच वाजता त्या दोघांना बीड येथील बसस्थानक परिसरातून ताब्यात घेत गेवराई पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा. उपाधीक्षक सुनील लांजेवार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, हवालदार रामदास तांदळे, नरेंद्र बांगर, तुळजीराम जगताप, पोलीस नाईक विकास वाघमारे, चालक सहायक उपनिरीक्षक संजय जायभाये यांनी केली.

Web Title: Two notorious criminals deported for a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.