बीड जिल्ह्यातील स्वाईन फ्ल्यूचे दोन रुग्ण उपचारानंतर घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:54 AM2018-09-21T00:54:12+5:302018-09-21T00:54:55+5:30

जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर धारूर ग्रामीण रुग्णालयात एकाने, तर दुसऱ्या रुग्णाने जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. दोघांची प्रकृती स्थिर असून, त्यांना रुग्णालयातून सुटी दिल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

Two patients of Swine Flu in Beed district have their home after treatment | बीड जिल्ह्यातील स्वाईन फ्ल्यूचे दोन रुग्ण उपचारानंतर घरी

बीड जिल्ह्यातील स्वाईन फ्ल्यूचे दोन रुग्ण उपचारानंतर घरी

Next
ठळक मुद्देप्रकृती स्थिर : नागरिकांनी घाबरू नये

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर धारूर ग्रामीण रुग्णालयात एकाने, तर दुसऱ्या रुग्णाने जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. दोघांची प्रकृती स्थिर असून, त्यांना रुग्णालयातून सुटी दिल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
गत महिन्यापासून जिल्हाभरात डेंग्यू, मलेरियासह इतर साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. तसेच स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनापुढे नवीन पेच निर्माण झाला आहे. गत तीन दिवसात जिल्हा रुग्णालयात २ रुग्ण आढळले आहेत. तर ३ जण स्वाईन फ्ल्यू सदृश रुग्ण असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारानंतर घरी पाठवले आहे.
साथीच्या रोगांना आळा घालण्यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने कुठलीही कार्यवाही केली जात नाही. अस्वच्छता, उघड्या गटारी, अशुद्ध पाण्यामुळे अधिक प्रमाणात साथीचे रोग पसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. बीडसह जिल्ह्यातील इतर शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. सांडपाणी वाहून नेणाºया गटारी उघड्या असल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. अनेक महिन्यांपासून डास प्रतिबंधक धूर फवारणी करण्यात आलेली नाही.
स्वाईन फ्ल्यूची लक्षणे
स्वाईन फ्ल्यू असेल तर रुग्णाला सलग तीन दिवस १०० अंश सेल्सिअसच्या पुढे ताप येतो. डोकेदुखी, अंगदुखी, अती थकवा, अशक्तपणा, घसादुखी, दमा लागणे ही लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
....
नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. वेळेवर औषधोपचार मिळाल्यावर स्वाइन फ्ल्यू बरा होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. जिल्ह्यात आढळून आलेल्या रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. सर्वांनी स्वच्छतेसंदर्भात सतर्क राहून काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. अशोक थोरात
जिल्हा शल्य चिकित्सक बीड

Web Title: Two patients of Swine Flu in Beed district have their home after treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.