बँक खाते केवायसी करायचे सांगत दोन पेन्शनरांना अडीच लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:31 AM2021-08-01T04:31:27+5:302021-08-01T04:31:27+5:30
शहरातील पांगरी रोड माउली नगर भागात राहणारे अजिनाथ उत्तमराव नागरगोजे यांना २८ जुलै रोजी ९५१९९२२३९३ व ७३६४०४६०१५ या क्रमांकांवरून ...
शहरातील पांगरी रोड माउली नगर भागात राहणारे अजिनाथ उत्तमराव नागरगोजे यांना २८ जुलै रोजी ९५१९९२२३९३ व ७३६४०४६०१५ या क्रमांकांवरून फोन आला. संबंधित व्यक्तीने नागरगोजे यांना तुमचे बँक खाते केवायसी करायचे आहे, असे सांगून क्विक सर्च ॲप्लिकेशनवर जाण्यास सांगितले. केवायसी गुगल सर्चवर लिहून टाकले, परंतु पुढे काही आले नाही. त्यानंतर ऑनलाइन बँकिंग ॲपमध्ये जाऊन केवायसी अपडेट करण्यासाठी मार्गदर्शन केले. दरम्यान, नागरगोजे यांच्या दोन्ही खात्यांतून २४ हजार ९८७, १७ हजार २१४, १९ हजार, २० हजार, ९ हजार ९८३, १४ हजार ८६३, १८ हजार, ९ हजार ९८७ व ९ हजार या प्रमाणे १ लाख ६३ हजार ३४ रुपये काढून फसवणूक केली. याप्रकरणी अजिनात नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास पोलीस निरीक्षक ठोंबरे करीत आहेत.
आणखी एकाची फसवणूक
शहरातील गणपती नगरातील पेन्शनर भिकू रामराव उबाळे यांनाही असेच गंडविण्यात आले. त्यांना ९४०५४६२३१४ व ९३३९३७५००४ या क्रमांकांवरून फोन करून संबंधित व्यक्तीने तुमचे बँक खाते केवायसी करायचे सांगून उबाळे यांना बँक पासबुक, आधार नंबर व एटीएमची माहिती घेऊन उबाळे यांच्या खात्यावरील ७४ हजार ९०० रुपये काढून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल आहे.