जनावरांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 05:36 PM2019-01-14T17:36:32+5:302019-01-14T17:37:00+5:30
या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
कडा ( बीड ): घोडेगाव येथून आष्टीकडे जात असलेल्या टेम्पोत जनावरे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी वाहन अडवून रविवारी (दि.१३ ) रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान कडा पोलीस चौकीत आणले. पोलिसांनी रात्री उशिरा गोवंश क्रुरतेने वाहतूक केल्याप्रकरणी पोलीस शिपाई बंडू दुधाळ यांच्या फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
घोडेगाव येथून आष्टीकडे जात असलेल्या टेम्पो (एम. एच. १७ एएफ २३४९) मध्ये ११ गायी कत्तलीसाठी जात असल्याचा संशय आल्याने हा टेम्पो सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस चौकीजवळ अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने तशाच वेगात टेम्पो पुढे नेला. चौकात टेम्पो सामाजिक कार्यकर्त्यांनी जनावरांसह पकडून कडा चौकीत आणला. याप्रकरणी आष्टी पोलिसांनी सदरील टेम्पो चालक गणेश रमेश जाधव (रा. खरवंडी ता. नेवासा), साथीदार सादिक गुलाब शेख (रा. ममदापूर ता. राहता) यांच्यावर विना कागदपत्र, विना परवाना वाहन चालवत गोवंशाची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे