वाहन चोरी करणारे दोघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:40 AM2019-06-21T00:40:20+5:302019-06-21T00:40:52+5:30
शहरातील रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाची चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन संशयितांना डी. बी. पथकाने गुरुवारी पहाटे रंगेहाथ पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाची चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन संशयितांना डी. बी. पथकाने गुरुवारी पहाटे रंगेहाथ पकडले. ही कारवाई शहरातील बालेपीर भागात क रण्यात आली. दोन्ही संशयित पुणे, रायगडचे आहेत. सोमनाथ लक्ष्मण पंडिकोडे (२८, रा. सोमठाणा फाटा, तळेगाव, पुणे) व विजय मारोती शिंदे (३९, रा. कामोठे, ता. पनवेल जि. रायगड) अशी त्या संशयितांची नावे आहेत.
बीड शहरात रात्रीच्या वेळी गैरप्रकर होऊ नयेत यासाठी गस्त घातली जाते. शहरातील बालेपीर भागात डी.बी. पथकाचे कर्मचारी गुरुवारी पहाटे गस्त घालत होते. त्याचवेळी बालेपीर भागातील दर्गाजवळ राहणारे शेख चांद यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या मालवाहू जीप (क्र.एमएच २८ एबी-४१३६) चा दरवजा यावेळी सोमनाथ पंडिकोडे हा एका चावीच्या सहाय्याने उघडण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी गस्तीवरील पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाठल्या, थोडा वेळ निरीक्षक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेतली.
यावेळी जवळच उभ्या असलेल्या ट्रकच्या मागे विजय शिंदे हा लपलेला आढळला. पोलिसांना पाहून दोघांनीही तेथून पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. व पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
ही कारवाई डी.बी. पथकाचे सहायक फौजदार शेख जहूर, पो.ना. महेश जोगदंड, गोलू पठाण, पोकॉ. राहुल पाईकराव, बप्पासाहेब सारणीकर, चालक राहुल मस्के यांनी केली. या प्रकरणी शेख चांद यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.