परळी थर्मलचे दोन संच बंद, एक चालू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:39 AM2021-02-17T04:39:57+5:302021-02-17T04:39:57+5:30
परळी : राज्यात विजेची जास्त मागणी नसल्याने तसेच मेरिट ऑर्डर डिस्पॅच रेटमध्ये बसत नसल्याने येथील नवीन औष्णिक ...
परळी : राज्यात विजेची जास्त मागणी नसल्याने तसेच मेरिट ऑर्डर डिस्पॅच रेटमध्ये बसत नसल्याने येथील नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे दोन संच बंद ठेवण्यात आले आहेत, तर एक संच सुरु आहे.
संच क्रमांक ६ हा सोमवारी रात्री १२ वाजता, तर संच क्रमांक ७ हा मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता बंद करण्यात आला आहे. हे बंद केलेले दोन्ही संच लवकरच सुरु होतील, अशी माहिती परळी औष्णिक विद्युत केंद्राच्यावतीने देण्यात आली. परळी तालुक्यातील दाऊतपूर - वडगाव शिवारात नवीन औष्णिक विद्युत केंद्र असून, या केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत. या तीन संचांपैकी दोन संच सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. संच क्रमांक ८ मधून मंगळवारी दुपारी १८० मेगावॅट एवढी वीजनिर्मिती सुरु होती. परळी विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, दोन संच बंद ठेवण्यात आले आहेत. ते लवकरच सुरु होतील, सध्या एक संच सुरु आहे. तीन संचांची एकूण स्थापित क्षमता ७५० मेगावॅट एवढी आहे.