ओढ्याच्या पुरात दुचाकीसह वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह आढळले; धारूर तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 09:32 AM2021-09-27T09:32:18+5:302021-09-27T09:36:20+5:30

Rain In Beed : अतिवृष्टीमुळे या भागातील पुलावरून पाणी वाहत आहे

The two were swept away with the bike due to unpredictable water; Incidents in Dharur taluka | ओढ्याच्या पुरात दुचाकीसह वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह आढळले; धारूर तालुक्यातील घटना

ओढ्याच्या पुरात दुचाकीसह वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह आढळले; धारूर तालुक्यातील घटना

Next
ठळक मुद्देएकाचा मृतदेह रात्री तर एकाचा मृतदेह सकाळी आढळून आला

धारूर : तालूक्यातील चिंचपूर येथील दुचाकीवरील दोघे ओढ्याला आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने रविवारी रात्री वाहून गेले. दरम्यान, एकाचा मृतदेह रात्री उशिरा तर एकाचा आज सकाळी आढळून आला.

धारुर  तालुक्यात मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस कोसळत असून नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. तालुक्यातील अनेक गावांचा तालुक्याचा संपर्क तुटला आहे. यातच रविवारी रात्री पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरुन जाणारे दोघे जण वाहून गेल्याची घटना चिंचपूर रस्त्यावर घडली. ग्रामस्थांनी रात्री महादेव सोनवणे वय 45 वर्ष यांचा मृतदेह शोधला. तर उत्तम सोनवणे यांचा मृतदेह आज सकाळी सापडला.

धारुर ते चिंचपूर रस्त्यावर खारीचा पुल म्हणून ओळखला जाणाऱ्या ओढ्याला काल अतिवृष्टीमुळे पुर आलेला होता. रात्री या पुलावरुन केज तालुक्यातील उंदरी येथील महादेव सोणवने व उत्तम सोणवने आपल्या दुचाकी क्र. एम.एच. 44 एन. 7829 वरुन जात होते. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह दोघे वाहून गेले.

घटनास्थळी धारुर पोलिस  व ग्रामस्थांनी रात्री मदतकार्य सुरु केले. सदरील पुल हा नेहमीच पावसात पाण्याखाली जातो. हा परिसर वाण नदीचे पाणलोटक्षेत्र असून खारी म्हणून ओळखला जातो. या ओढ्याला पाणी आल्यावर तासन् तास वाहतूक खोळंबते. घटनास्थळी सध्या मोठी गर्दी असून वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत.

Web Title: The two were swept away with the bike due to unpredictable water; Incidents in Dharur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.