भाजीपाला विक्रीला दुचाकीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:38 AM2021-09-23T04:38:04+5:302021-09-23T04:38:04+5:30
--------------------------- पथदिव्यांची दुरवस्था अंबाजोगाई : शहरातील विविध वसाहतीतील पथदिव्यांची दुरवस्था झाली असून, रात्रीच्या वेळेस नागरिकांना नाहक त्रास सहन करावा ...
---------------------------
पथदिव्यांची दुरवस्था
अंबाजोगाई : शहरातील विविध वसाहतीतील पथदिव्यांची दुरवस्था झाली असून, रात्रीच्या वेळेस नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------------------------
ट्रिपल सीटधारकांवर कारवाईची गरज
अंबाजोगाई : शहरात दुचाकीस्वारांची संख्या वाढलेली आहे. दुचाकीवर दोन जणच बसणे अपेक्षित असताना अनेक दुचाकींवर तीन-तीन जण बसून प्रवास करतानाचे चित्र शहरात दिसून येत नाही. मात्र, अशांवर केवळ दंडात्मक कारवाई करण्यात येते. दंड भरून नियम मोडणारे मोकळे होतात. त्यामुळे ट्रिपल सीट बसवून प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
------------------------------
भविष्यनिर्वाह निधीच्या पावत्या मिळाव्यात
अंबाजोगाई : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधीच्या पावत्या देण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. भविष्यनिर्वाह निधीच्या पावत्या नियमित मिळत नसल्याने शिक्षक संघटनांकडून प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
----------------------------------
कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरूच
अंबाजोगाई : खातेनिहाय शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश आहेत. मात्र, बहुतांश कर्मचारी शहरात रहात असून तिथून आपला कारभार सांभाळत आहेत. सध्या कोरोनाची महामारी सुरू आहे. नागरिक भयभीत झाले आहेत. अशावेळी किमान शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी रहावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.