चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:41 AM2021-06-09T04:41:09+5:302021-06-09T04:41:09+5:30
बीड : तालुक्यातील मांजरसुंबा ते पाटोदा जाणाऱ्या महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना ७ जून ...
बीड : तालुक्यातील मांजरसुंबा ते पाटोदा जाणाऱ्या महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना ७ जून रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. चारचाकी मधील दाम्पत्य देखील गंभीर जखमी झाले आहे.
संजय उर्फ बापू भाऊसाहेब हुंबे (वय ४५ रा.चौसाळा ता. बीड) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते मोरगावरून मांजरसुंब्याच्या दिशेने दुचाकी (क्र.एमएच २३ एजी १६११) वरून येत होते. पाटोदा ते मांजरसुंबा या महामार्गावर त्यांची दुचाकी अचानक आली. यावेळी पाटोद्याकडून येणारी भरधाव वेगातील कार (क्र.एमएच २३ एडी ३३२१) नियंत्रित न झाल्याने दुचाकीला जोराची धडक दिली. ही घटना सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान महामार्गावरील नागोबा फाट्यावर घडली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी याची माहिती नेकनूर पोलिसांना दिली. त्यानंतर पोउपनि जाधव, जमादार एस.एस. राऊत, सुरेश पारधी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून चौसाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. चारचाकी वाहन मालक पाटोदा तालुक्यातील दासखेड येथील रहिवासी असल्याची माहिती असून, त्यांच्यावर देखील उपचार सुरु आहेत. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. तपास जमादार एस.एस. राऊत हे करत आहेत.
बघ्यांना सुज्ञ नागरिकांनी हाकलले
अपघात झाल्यानंतर नागरिकांनी प्रशासनास मदत करावी अशी अपेक्षा असते. मात्र, काहीजण त्याठिकाणी मोबाईलमध्ये शूटिंग करण्यात व्यस्त होते. ही बाब मदत करणाऱ्या सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बघ्यांना त्याठिकाणावरून हाकलून लावले तर, अपघात झाल्यानंतर मदत करणे ही आपली जबाबदारी असून ती करावी असे आवाहन डॉ.गणेश ढवळे यांनी केले आहे.
===Photopath===
070621\07_2_bed_14_07062021_14.jpg
===Caption===
अपघात झाल्यानंतर कार उलटली होती.