जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:39+5:302021-06-06T04:25:39+5:30
रामप्रसाद आश्रुबा भडके (रा. कांबी, ता. बीड) यांची दुचाकी २६ मे रोजी बीड जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. ...
रामप्रसाद आश्रुबा भडके (रा. कांबी, ता. बीड) यांची दुचाकी २६ मे रोजी बीड जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. रात्री ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी ती लंपास केली. दुसरी घटना २९ मे रोजी गेवराई शहरातील भगवती कॉम्पलेक्ससमोर घडली. नितीन आबासाहेब बाराखडे (रा. गोविंदवाडी, ता. गेवराई) यांची ४० हजारांची दुचाकी (क्र.एम.एच. २३ ए.एम.५०७६) चोरट्यांनी हॅन्डल लॉक तोडून चोरुन नेली. याच ठाणे हद्दीतील पांगरी ते शिराळा रस्त्यावरील शेतातून गोटीराम प्रभू जाधव (रा. हरिलालनाईक तांडा, केकतपांगरी) यांची ३० हजारांची दुचाकी (क्र.एम.एच.२० सी.डी.८७२३) चोरट्यांनी २८ मे रोजी लंपास केली. चौथी घटना आष्टी शहरातील आझादनगर येथे घडली. व्यापारी खालेद हरुण शेख यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र. एम.एच.२३ एव्ही.७०९०) चोरट्यांनी २६ मे रोजी सायंकाळी घरासमोरुन लंपास केली. याप्रकरणी गुन्हे दाखल झाले असून, दुचाकी चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.