दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:53+5:302021-07-15T04:23:53+5:30

वडवणी : शहर तसेच ग्रामीण भागातून दुचाकी चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या ...

The two-wheeler thief smiled | दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या

दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या

Next

वडवणी : शहर तसेच ग्रामीण भागातून दुचाकी चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे वडवणी प्रभारी अधिकारी सपोनि नितीन मिरकर,पोउपनि जयसिंग परदेशी,पोह बी.बी.डोळस, विठ्ठल गिते, पोना मनोज जोगदंड,लखन गंगावणे,विलास खरात यांचे विशेष पथक नेमले होते. वडवणी हद्दीत पेट्रोलिंग करताना गुप्त बातमीदारामार्फत पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दुचाकी ७ जून रोजी चिंचाळा परिसरातून चंद्रकांत हरिभाऊ घोलप रा. चिंचवडगाव ता. वडवणी जि. बीड याने चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास करताना ६ जुलै रोजी चंद्रकांत घोलप हा दुचाकी चोरी करण्याच्या उद्देशाने वडवणी शहरात फिरत असल्याचे दिसून आले. दुचाकी चोरीप्रकरणी त्यास अटक केली. तपासादरम्यान चंद्रकांत घोलप याच्याकडून बीड जिल्ह्यात बीड,वडवणी,परळी व अहमदनगर जिल्ह्यातून चोरलेल्या विविध नऊ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. यामुळे बीड व अहमदनगर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी चंद्रकांत घोलप हा अटकेत असून पुढील तपास सुरु आहे.

Web Title: The two-wheeler thief smiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.