जिल्हाबंदीतून दुचाकींना सूट द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:37 AM2021-04-28T04:37:07+5:302021-04-28T04:37:07+5:30
अंबाजोगाई :लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हाबंदी केलेली आहे. मात्र जिल्हाबंदी करताना मालवाहतूक,बस वाहतूक यांना सूट देण्यात आली आहे. ...
अंबाजोगाई :लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हाबंदी केलेली आहे. मात्र जिल्हाबंदी करताना मालवाहतूक,बस वाहतूक यांना सूट देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे दुचाकीस्वारांना ही जिल्हाबंदीतून सूट द्यावी. दुसऱ्या जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या नागरिकांना कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागते.अशा वेळी मोठी अडचण येत आहे.यासाठी जिल्हाबंदीतून सूट द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आनंद टाकळकर यांनी केली आहे.
मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांना तंबी
अंबाजोगाई :संचारबंदी लागू असताना व सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई केली असतानाही अंबाजोगाई शहरातील नागरिक सकाळी लवकर उठून मॉर्निंगवॉकसाठी जात आहेत. मंगळवारी सकाळी अशा फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी समज देऊन सोडून दिले.
विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनावर पुढील प्रवेश
अंबाजोगाई : या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १० वी च्या सर्व विध्यार्थ्यांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करण्यात आले. मात्र १० वी नंतरच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चुरस निर्माण होणार आहे.त्यामुळे विध्यार्थ्यांचे योग्य आणि अचूक मूल्यांकन व्हावे.तरच विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.अन्यथा विविध अभ्यासक्रमाच्या जागा वाढवाव्यात, अशी मागणी मैत्री शिक्षक ग्रुपचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी केली आहे.
मास्क वापराबाबत जनजागृती मोहीम
अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मास्क चा वापर,सोशल डिस्टन्स,व सतत हात धुणे.हा उपक्रम तालुक्यातील नागरिकांना समजून सांगणे.या बाबत व विविध अडचणींवर उपाय योजना सांगणे.यासाठी येथील आधार माणुसकीचा ही संस्था कार्य करत आहे.
हातावर पोट असणाऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
अंबाजोगाई :कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने लॉकडाऊन च्या धर्तीवर अनेक उधोग,व्यवसाय बंद आहेत.परिणामी अनेकांवर बेरोजगारी ची वेळ आली आहे. अनेक हातावर पोट असणाऱ्या घटकांना शासकीय मदतीची नितांत आवश्यकता आहे. जे बेरोजगार आहेत.त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत देशपांडे यांनी केली आहे.