दोन महिलांची कमाल, शेतकरी कंगाल; गोडगोड थापांना भुलून १४ लाखांना फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 02:15 PM2022-03-10T14:15:33+5:302022-03-10T14:15:33+5:30

लिंबू प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून तक्रारदाराने संबंधिताला दिले होते, अशी प्राथमिक माहिती आहे.

two women cheated a farmer; looted 14 lakhs | दोन महिलांची कमाल, शेतकरी कंगाल; गोडगोड थापांना भुलून १४ लाखांना फसला

दोन महिलांची कमाल, शेतकरी कंगाल; गोडगोड थापांना भुलून १४ लाखांना फसला

Next

परळी (जि. बीड) : केंद्र सरकारमार्फत लिंबू प्रक्रिया उद्योग सुरू करून ९० टक्के अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील सारडगाव येथील एकाची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ८ मार्च रोजी नाशिक येथील दोन महिलांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

प्रदीप शत्रुघ्न तांदळे (३६, रा.सारडगाव), असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तुमच्या संस्थेस भारत सरकारच्या लघु, सूक्ष्म व मोठ्या कर्ज योजनेंतर्गत ९० टक्के अनुदानावर लिंबू प्रक्रिया उद्योग सुरू करून देतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर सारडगाव येथे येऊन पाहणी केली. यादरम्यान त्यांच्याकडून तब्बल १४ लाख ५ हजार रुपये उकळले व नंतर प्रक्रिया उद्योगाला मंजुरी मिळाली ना अनुदान आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रदीप तांदळे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यावरून मनीषा देवीदास तंवर, स्मिता पांडुरंग बोडके (दोघी रा.नाशिक) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. तपास सपोनि विशाल शहाणे करीत आहेत.

म्हणे अधिकाऱ्यांना द्यावे लागतात
९० टक्के अनुदानाची योजना मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात, असे सांगितले गेले. त्या दोघींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फोन-पे वर प्रदीप तांदळे यांनी १४ लाख ५ हजार रुपये पाठविले.

व्याप्ती मोठी
लिंबू प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून तक्रारदाराने संबंधिताला दिले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. फसवणुकीचा आकडा आणखी वाढू शकतो. त्यामुळे प्रकरणाची व्याप्ती अधिक असण्याची शक्यता आहे. तपास सुरू आहे.
- विशाल शहाणे, सहायक निरीक्षक, परळी ग्रामीण ठाणे
 

Web Title: two women cheated a farmer; looted 14 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.