आरोग्य शिबिराहून परताना दोन तरुण डॉक्टरांचा कार अपघातात जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 01:44 PM2023-06-09T13:44:48+5:302023-06-09T13:45:54+5:30

अंबाजोगाईजवळ कार अपघातात दोन तरुण डॉक्टरांचा मृत्यू

Two young doctors died on the spot in an car accident while returning from health camp | आरोग्य शिबिराहून परताना दोन तरुण डॉक्टरांचा कार अपघातात जागीच मृत्यू

आरोग्य शिबिराहून परताना दोन तरुण डॉक्टरांचा कार अपघातात जागीच मृत्यू

googlenewsNext

अंबाजोगाई - येथून आडसकडे जाणाऱ्या रोडवर कार झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात अंबाजोगाई येथील डॉ. प्रमोद राजाभाऊ बुरांडे (वय ३९) आणि डॉ. रवी संतोष सातपुते (वय ३८) यांचा मृत्यू झाला. आज शुक्रवारी(दि.०९) दुपारी १२ वाजता हा अपघात झाला. 

डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी सातपुते हे दोघेही निष्णात फिजिओथेरपिस्ट होते. आडस येथील एका आरोग्य शिबिराला भेट देऊन ते कारमधून (एमएच ४४ एस ३९८३) अंबाजोगाईकडे निघाले होते. आडस ते चनई रोडवर उतारावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेच्या झाडाला धडकली. या अपघातात दोन्ही डॉक्टरांचा मृत्यू झाला. दोन उमद्या डॉक्टरांच्या मृत्यूमुळे अंबाजोगाईत हळहळ व्यक्त होत आहे.
 

Web Title: Two young doctors died on the spot in an car accident while returning from health camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.