आपले सरकार सातबारा कोरा करणार- उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 11:45 PM2019-11-05T23:45:19+5:302019-11-05T23:47:10+5:30
परतीच्या पावसाने शेतकºयाच्या हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. यात पीक विमा कंपनी या कागदी घोडे नाचवण्याचे काम करीत आहेत परंतु आता हे कागदी घोडे नाचवले जाणार नाहीत आपले सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल, असे सूचक विधान पावसाने नुकसान झालेल्या पाहणी दौºयात माजलगाव याठिकाणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
माजलगाव : परतीच्या पावसाने शेतकºयाच्या हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. यात पीक विमा कंपनी या कागदी घोडे नाचवण्याचे काम करीत आहेत परंतु आता हे कागदी घोडे नाचवले जाणार नाहीत आपले सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल, असे सूचक विधान पावसाने नुकसान झालेल्या पाहणी दौºयात माजलगाव याठिकाणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
परतीच्या पावसाने शेतकºयाचे कंबरडे मोडले आहे. यात शेतकरी संपूर्ण खचून गेला आहे. पावसाने शेतकºयाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. असे असताना पीक विमा कंपन्या ह्या कागदी घोडे नाचवण्याचे काम करीत आहेत.परंतु आजच्या पाहणी दौºयात जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्याने यापुढे या विमा कंपन्या कागदी घोडे नाचवणार नाहीत. यंत्रणेचे सर्व लोक हे बांधावर येऊन पंचनामे करतील आणि नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होतील. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना बँक या शेतकºयांना नोटीस पाठवत आहेत परंतु शेतकºयाने या नोटीसकडे लक्ष देऊ नये. खचून न जाता हिमतीने या अस्मानी संकटाचा सामना आपण करू. शिवसेनाही कायम शेतकºयाच्या खांद्याला खांदा लावून सोबत राहील. शेतकºयांच्या सर्व अडीअडचणी या सोडवण्यात येतील आणि त्यासाठी शिवसेना ही कायम वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी अनेक शेतक-यांनी उद्धव ठाकरे यांना निवेदने दिली.
ठाकरे यांच्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे, अनिल देसाई, जयदत्त क्षीरसागर, चंद्रकांत खैरें, मिलिंद नार्वेकर, राजेश देशमुख, शिवाजीराव गुट्टे, दिनकर मुंडे, श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे, नामदेवराव आघाव, प्रा.विजय मुंडे, शिवसेनेचे व्यंकटेश शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, बाळासाहेब पिंगळे, राजेश देशमुख, रमेश आडसकर, रमेश पोकळे, माऊली फड, तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, शालिनी कराड शांतीलाल जैन, विकासराव डूबे, अशोक जैन, अनिल जगताप, माजलगावचे अप्पासाहेब जाधव, अमोल डाके, अशोक आळणे, शिवमूर्ती कुंभार, पापा सोळंके, दत्ता रांजवण उपस्थित होते. ठाकरे यांनी अतिवृष्टी भागास भेटी दिल्या. त्यांनी परळी- बीड रस्त्यावरील गोपीनाथ गड येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. ठाकरे हे गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शनासाठी येणार असल्याने मंगळवारी सकाळी गडाचे सेवक विठ्ठल दगडोबा मुंडे (रा.लिंबोटा) यांनी कमळ-धनुष्यबाणाची रांगोळी साकारली. ही रांगोळी प्रसारमाध्यमांतून चर्चेत राहिली.
कौटुंबिक जिव्हाळा कायम राहो : पंकजा मुंडे
भाजपच्या कोअर कमिटीची बैठक असल्याने राज्याच्या ग्रामविकास आणिमहिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे मुंबईत होत्या. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, आदरणीय उद्धवजी ठाकरे गोपीनाथगड येथे पोहोचले आहेत. मी त्यांचे स्वत: प्रत्यक्षात स्वागत करण्यासाठी नाही. पण मनापासून स्वागत !! राजकारणापलीकडे हा वैयक्तिक जिव्हाळा आपल्या परिवारात नेहमी होता. मुंडेसाहेबांच्या पश्चात आपण तो तसाच ठेवलात. ते प्रेम सदैव कायम राहो! परळीत पाच वाजता उद्धव ठाकरे यांचा गोपीनाथगडावर दौरा होता, त्यामुळे तीन वाजल्यापासून कार्येकर्ते गडावर जमण्यास सुरु वात झाली. परंतु ते सव्वातीन तास उशिरा पोहोचले.. दरम्यान ते कधी येणार , आणि काय बोलणार, उपस्थित सेना- भाजप कार्यकर्त्यांची संवाद साधणार का, अशी उत्सुकता होती, परंतु ते मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन गाडीत बसून निघून गेले. त्यांना बोलण्यासाठी टेबल खुर्ची, माइकही लावून ठेवले होते, कार्येकर्ते पदाधिकारी ते बोलणार म्हणून खुर्चीवर चार तास बसून राहिले