भारनियमनामुळे उकाडा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:36 AM2021-04-28T04:36:11+5:302021-04-28T04:36:11+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन जाहीर केला आहे. नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. सर्वांनी आपापल्या घरातच ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन जाहीर केला आहे. नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. सर्वांनी आपापल्या घरातच थांबावे, असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एम. बी. घुबडे यांनी केले आहे.
ग्रामीण भागात नागरिक हे घरीच थांबणे पसंत करीत असून बाहेर पडले तर लाठीचा मार तर घरात घाम अशी परिस्थिती ग्रामीण भागात दिवसा वीजपुरवठा बंद असल्याने होत आहे. यामुळे लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांची कसरत करावी लागते. ग्रामीण भागात उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात बसत आहेत. लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. घरात दिवसाच्या भारनियमनामुळे उकाडा वाढला आहे. महावितरणने दिवसा सिंगल किंवा थ्रीफेज लाईट सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.