विस्थापित ३६ पदवीधर शिक्षकांचे अखेर समायोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:29 AM2019-07-10T00:29:31+5:302019-07-10T00:30:38+5:30

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्यानंतर रखडलेल्या समायोजन प्रक्रियेला मंगळवारी मुहूर्त मिळाला.

Ultimately adjustment of 36 graduate teachers displaced | विस्थापित ३६ पदवीधर शिक्षकांचे अखेर समायोजन

विस्थापित ३६ पदवीधर शिक्षकांचे अखेर समायोजन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्यानंतर रखडलेल्या समायोजन प्रक्रियेला मंगळवारी मुहूर्त मिळाला. ३६ प्राथमिक पदवीधर शिक्षकांना समुपदेशन पध्दतीने पदस्थापना देण्यात आली.
जिल्ह्यातील १०८० प्राथमिक संवर्गातील शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या झाल्यानंतर विस्थापिक शिक्षकांच्या समायोजनेचा विषय ऐरणीवर होता. त्यानंतर मुख्याध्यापक पदी पदोन्नती तसेच इतर विषयांच्या प्रक्रियेमुळे समायोजन प्रक्रिया लांबत चालली होती. अखेर मंगळवारी (९ जुलै) प्राथमिक पदवीधरांच्या समायोजनेसाठी मंगळवारी पात्र शिक्षकांना बोलवण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात समायोजन प्रक्रिया पार पडली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, जि. प. सदस्य अशोक लोढा, शिक्षणाधिकारी (मा.) भगवान सोनवणे, उपशिक्षणाधिकारी बी. एस. सोनवणे, मोहन काकडे, हिरालाल कराड, विस्तार अधिकारी विठ्ठल राठोड, तुकाराम पवार,सर्व गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक गिरीश बिजलवाड, संगणक परिचालक अविनाश गजरे, मनोज लोखंडे, सचिन बेदरे, तुषार शेलार, दिलीप पुलेवाड आदी उपस्थित होते. यावेळी पदवीधर विस्थापित १२ महिला शिक्षक आणि २४ शिक्षक अशा ३६ जणांचे समायोजन करण्यात आले.
१२ जुलैसाठी याद्या लावल्या
२५९ सहशिक्षकांना १२ जुलै रोजी समुपदेशनातून पदस्थापना देण्यात येणार आहे. जिल्हा अंतर्गत बदली २०१९ नुसार प्राथमिक संवर्गातील शिक्षकांच्या संवर्ग १, २ व ४ अन्वये, बदली आॅनलाईनद्वारे पूर्ण झाली. या प्रक्रियेनंतर विस्थापित व २०१८ मधील रॅन्डम राउंडमधील प्राथमिक शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापनेची कार्यवाही जिल्हा स्तरावर होत असून, शिक्षकांची अंतिम ज्येष्ठता यादी बीईओ कार्यालयात डकविण्याचे सूचित केले आहे. गैरहजर शिक्षकांना जिल्हा स्तरावरुन समुपदेशनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या जागा रिक्त राहतील, तेथे संबंधितांची पदस्थापना करण्यात येणार आहे.

Web Title: Ultimately adjustment of 36 graduate teachers displaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.