अंबाजोगाईतील मंडी बाजारात अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:31 AM2021-01-18T04:31:03+5:302021-01-18T04:31:03+5:30
गुटखा, दारू विक्री माजलगाव : तालुक्यातील टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखा बंदी असूनही गावात ...
गुटखा, दारू विक्री
माजलगाव : तालुक्यातील टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखा बंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसार उघड्यावर आले असून व्यसनाधिनतेमुळे कुटुंबातील कलह वाढत चालले आहेत.
पारदर्शक पाइप बसवा
तेलगाव : अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर टाकीमध्ये पेट्रोल न टाकता नागरिकांचे फसवणूक केली जाते. पेट्रोल टाकत असताना ते आपल्या टाकीत पडते का, हे नागरिकांना दिसावे, यासाठी पेट्रोल भरण्यासाठी असलेला पाईप पारदर्शक असावा, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.
पाण्याचा अपव्यय थांबविण्याचे आवाहन
अंबाजोगाई : समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण व काळवटी साठवण तलाव हे दोन्ही जलस्त्रोत तुडुंब भरले आहेत. पाणीसाठा भरपूर उपलब्ध झाल्याने नळाला मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. नागरिकांनी नळाला तोट्या बसवून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे.
पांदण रस्त्याची मागणी
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करून देखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पंचायत समितीने यामध्ये लक्ष घालून रस्ता करावा, अशी मागणी होत आहे.