स्थानकात अस्वच्छता; आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:28 AM2021-01-02T04:28:05+5:302021-01-02T04:28:05+5:30
बीड येथील अवैध गतिरोधकामुळे त्रास बीड : शहरातील पेठ भागात गल्लीबोळांत तयार केलेल्या अवैध गतिरोधकांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा ...
बीड येथील अवैध गतिरोधकामुळे त्रास
बीड : शहरातील पेठ भागात गल्लीबोळांत तयार केलेल्या अवैध गतिरोधकांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा वाहने आदळून नुकसान होते, तसेच अपघाताचा धोका संभवतो. या गतिरोधकामुळे वाहनांची गती कमी होत असलीतरी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
कित्येक महिन्यांपासून घरकुलाचे हप्ते थकले
बीड : कित्येक महिन्यांपासून बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकलेले हप्ते नगर परिषदेकडून लाभार्थींच्या खात्यावर टाकण्यात आलेले नाहीत. याबाबत वारंवार मागणी करूनदेखील आश्वासनाशिवाय दुसरे काहीही लाभार्थींना मिळत नाही. तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आहे.
काटेरी झुडपांचा वाहनधारकांना त्रास
राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० कि.मी. रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी, अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. झुडपे काढण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांनी केली आहे; परंतु याकडे लक्ष न दिल्याने वाहनधारकांना त्रास सुरूच आहे.
श्वानांना आवर घाला
बीड : शहरातील अनेक भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हे भटके कुत्रे टोळक्याने बसत असल्याने रात्रीच्या वेळेस हे कुत्रे दिसून येत नसल्याने हल्ला चढवत आहेत. यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
सिग्नल सुरू करा
बीड : शहरातील मुख्य चौकात उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. ही सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे अनेक वेळा वाहनधारक, नागरिकांतून सुरू करण्याची मागणी होती; परंतु याची दुरुस्ती झालेली नाही.
झाडे बहरू लागली
बीड : शहरातील दुभाजकांवर सुशोभीकरणाची झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे सद्य:स्थितीत चांगल्या प्रकारे बहरू लागल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. यांची निगा राखण्याची मागणी होत आहे.