‘उंदरीन सुंदरीन’ कविता संग्रहास पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:40 AM2021-09-09T04:40:39+5:302021-09-09T04:40:39+5:30
शिरूर कासार : साहित्यिक, कवी विठ्ठल जाधव यांच्या ‘उंदरीन सुंदरीन’ या बालकविता संग्रहास नाशिक येथील कादवा प्रतिष्ठानचा प्रतिष्ठित राज्यस्तरीय ...
शिरूर कासार : साहित्यिक, कवी विठ्ठल जाधव यांच्या ‘उंदरीन सुंदरीन’ या बालकविता संग्रहास नाशिक येथील कादवा प्रतिष्ठानचा प्रतिष्ठित राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
कादवा प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीत मराठी वाङ्मय पुरस्कार दिले जातात. सन-२०१९ चा चिंतामण शंकर स्मृती बालसाहित्य राज्य पुरस्कार विठ्ठल जाधव यांच्या ‘उंदरीन सुंदरीन’ या कवितासंग्रहास जाहीर झाला आहे. विठ्ठल जाधव गत तीन दशकांपासून सातत्याने विविध लेखन प्रकारांत लेखन करीत आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. तिवढा (कथासंग्रह), पांढरा कावळा (कादंबरी), गर्भकळा आणि उंदरीन सुंदरीन (कवितासंग्रह), बटाटीची धार (कथासंग्रह), मानवता व्हाऊचर (लेखसंग्रह) आदी साहित्य संपदा प्रकाशित आहे. महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कारही विठ्ठल जाधव यांच्या साहित्यकृतीस लाभला आहे. नाशिक येथे कादवा प्रतिष्ठानचे विजयकुमार मिठे यांनी साहित्य पुरस्काराची घोषणा केली. नांदेड येथील इसाप प्रकाशनने हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे.
080921\1235-img-20210908-wa0008.jpg
उंदरिन सुंदरीने बाल साहित्य यास पुरस्कार