प्रशिक्षणाच्या नावाखाली दुकानदारीचा ‘खेळ’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:20 AM2018-01-20T00:20:34+5:302018-01-20T00:20:58+5:30

बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलात प्रशिक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालविली जात आहे. प्रशिक्षणार्थ्यांकडून लाखोंची कमाई केली जात असताना क्रीडा कार्यालयाला मात्र एक रुपयाही जागेचा किराया दिला जात नसल्याचे समोर आले आहे. या सर्वांना यापूर्वी अनेकवेळा तोंडी सुचना दिल्या परंतु काहीच फरक पडला नाही. जागेचा किराया दिला नाही तर आता जिल्हा क्रीडा अधिका-यांकडून थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

Under the training name 'shopping'! | प्रशिक्षणाच्या नावाखाली दुकानदारीचा ‘खेळ’!

प्रशिक्षणाच्या नावाखाली दुकानदारीचा ‘खेळ’!

googlenewsNext
ठळक मुद्देबीड क्रीडा संकुलातील प्रकार : जिल्हा क्रीडा अधिकाºयांकडून किराया न देणा-यांवर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील जिल्हा क्रीडा संकुलात प्रशिक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालविली जात आहे. प्रशिक्षणार्थ्यांकडून लाखोंची कमाई केली जात असताना क्रीडा कार्यालयाला मात्र एक रुपयाही जागेचा किराया दिला जात नसल्याचे समोर आले आहे. या सर्वांना यापूर्वी अनेकवेळा तोंडी सुचना दिल्या परंतु काहीच फरक पडला नाही. जागेचा किराया दिला नाही तर आता जिल्हा क्रीडा अधिका-यांकडून थेट कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

जिल्हा क्रीडा संकुल मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांवरून चांगलेच चर्चेत आहे. क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संकुलासह कार्यालयाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले होते. हाच धागा पकडून संकुलाची स्वच्छता करीत कार्यालयाचे कामकाज गतीमान करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे कामाला लागल्या आहेत.

एवढेच नव्हे तर संकुल परिसरात विविध खेळांचे प्रशिक्षण चालवून कार्यालयाला भाडे न देणाºयांची यादी त्यांनी मागविली आहे. यामध्ये क्रिकेट, कुस्ती, बॅडमिंटन व इतर खेळांचा समावेश आहे. आता यांनी आतापर्यंत वापरलेल्या जागेचा आणि यापुढे किराया दिला नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे खुरपुडे म्हणाल्या.

दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून काही ठराविक खेळांसाठी जागा अतिक्रमित केली आहे. या जागेवर इतर खेळाडूंना खेळण्यास मज्जाव केला जातो. अशीच परिस्थिती बॅडमिंटन हॉल, कुस्ती व इतर खेळांची आहे. यांनीही जागेवर कब्जा मिळविला असून अद्यापपर्यंत कार्यालयाला एक रूपयाही भाडे दिले नसल्याचे सांगण्यात आले. आता या सर्वांकडून किराया आकारून मिळाणाºया पैशातून संकुलात येणा-यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.

सर्वांना किराया ठरवून द्यावा
सध्या तायक्वांदो, स्केटींग, जीम, कराटे या खेळाचे प्रशिक्षण देणाºया कार्यालयाला किराया देत आहेत. परंतु देत असलेला किराया नाममात्र आहे. सर्वांना समान व नियमाप्रमाणे किराया आकारावा. जे किराया देणार नाहीत, त्यांची संकुलातून हकालपट्टी करून सर्वसामान्याांसाठी संकुल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

संकुलात कोणालाही दुकानदारी करू दिली जाणार नाही. संकुल सर्वांसाठीच आहे. काही लोकांकडून किराया आकारला जात आहे, परंतु काहींना सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आता त्यांची गय केली जाणार नसून कारवाईची मोहीम हाती घेतली जाईल. एक बैठक घेऊन याबाबत निर्णय होईल. खेळाडू, प्रशिक्षक, नागरिकांनी सहकार्य करावे.
- नंदा खुरपुडे, जिल्हा क्रीडा अधिकारी, बीड


बॅडमिंटनसाठी एका व्यक्तीसाठी हजार रूपये
संकुलात बॅडमिंटन हॉल आहे. यामध्ये तीन कोर्ट आहेत. येथे खेळण्यास येणाºया एका व्यक्तीकडून एका तासासाठी प्रति महिना एक हजार रूपये भाडे आकारले जाणार आहे. याच पैशातून या हॉलच्या सफाईसाठी आणि नियोजनासाठी दोन कर्मचारी नियुक्त केले जातील, असे खुरपुडे म्हणाल्या.

वॉकिंग करणा-यांकडून पैसे नकोत
संकुलात वॉकिंगसाठी येणा-यांकडून नाममात्र किराया आकारण्याचे नियोजन आहे. परंतु संकुल हे सर्वसामान्यांसाठी आहे. त्यांच्याकडून किराया आकारला तर नागरिकांमध्ये रोष निर्माण होईल. त्यामुळे वॉकिंगसाठी येणा-यांकडून किराया आकारू नये, अशी मागणी होत आहे. यापूर्वी एका अधिका-यांनी किराया आकारण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस बीडकरांसह खेळाडूंमधून तीव्र संताप व्यक्त झाला होता. आता पुन्हा तशी परिस्थिती उद्भवू देवू नये, अशी मागणीही होत आहे.

Web Title: Under the training name 'shopping'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.