अंथरवण पिंपरी आश्रमशाळेत गणवेश वाटप कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:16 AM2021-01-24T04:16:11+5:302021-01-24T04:16:11+5:30
बीड : येथून जवळ असलेल्या श्री. सद्गुरू बंजारा सेवा संघ बीड, संचलित प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तथा दीनानाथ ...
बीड : येथून जवळ असलेल्या श्री. सद्गुरू बंजारा सेवा संघ बीड, संचलित प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तथा दीनानाथ बालकाश्रम अंथरवण पिंपरी तांडा (ता.जि.बीड) येथे कोविड-१९ च्या नियमाचे पालन करून निवासी, बालकाश्रम व अनिवासी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम.पी. राठोड, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष दिनेशराव पवार, मुख्याध्यापक शिंदे, पर्यवेक्षक खंदारे हे उपस्थित होते. सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविक मुख्याध्यापक शिंदे यांनी केले. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.
यावेळी दिनेशराव पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनाे कोविड-१९ ला घाबरू नका. नियमाचे पालन करून नियमित शाळेत येऊन अभ्यास करावा.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य राठोड म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजेत. त्या प्रश्नाचे चौकस बुद्धीने विचार करून उत्तर मिळविले पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. एन. शिंदे, आभारप्रदर्शन एन. आर. जाधव यांनी केले. यशस्वीतेसाठी एन. जे. जाधव, आर. पी. कोल्हे, कांबळे तसेच आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.