विश्वाला बुद्धांच्या विज्ञानवादी धम्माची नितांत गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:18 AM2019-11-02T00:18:11+5:302019-11-02T00:20:05+5:30
तथागत सिध्दार्थ गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म हा विज्ञानवादी आहे. या धम्मात माणसा-माणसामध्ये कधीही भेदभाव केला जात नाही. आजघडीला या देशालाच नव्हे तर अवघ्या विश्वाला बुध्दांच्या विज्ञानवादी धम्माची नितांत गरज आहे.
बीड : तथागत सिध्दार्थ गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म हा विज्ञानवादी आहे. या धम्मात माणसा-माणसामध्ये कधीही भेदभाव केला जात नाही. आजघडीला या देशालाच नव्हे तर अवघ्या विश्वाला बुध्दांच्या विज्ञानवादी धम्माची नितांत गरज आहे. एवढेच नाही तर प्रज्ञा, शील, करुणेची शिकवण देणाऱ्या बुद्धांच्या धम्म पथाचा मार्ग हा मानवतेच्या समतेची पहाट असल्याचे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु भीमराव आंबेडकर
बीड शहरात भिक्खु धम्मशील यांच्या सातव्या वर्षावासाच्या समापनानिमित्त १ नोव्हेंबर रोजी भव्य बौध्द धम्म परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी आंबेडकर बोलत होते. यावेळी धम्म परिषदेचे मार्गदर्शक भिक्खु डॉ.उपगुप्त महाथेरो, सोहळ्याचे उद्घाटक भिक्खु के. संघिरक्षत महाथेरो, अध्यक्षस्थ भिक्खु धम्मसेवक महाथेरो, भिक्खु शरणानंद महाथेरो, स्वागताध्यक्ष राजेंद्र घोडके, प्रमुख अतिथी डॉ.एस.पी.गायकवाड, डॉ.अरविंद गायकवाड, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष संदिप उपरे यांच्यासह देशभरातून आलेल्या भन्तेंची लक्षणीय उपस्थिती होती.
भीमराव आंबेडकर म्हणाले, देशाच्या प्रत्येक शहरात व गावागावात बौद्ध धम्माच्या परिषदा होणे गरजेचे आहे. तथागत सिध्दार्थ गौतम बुध्दांनी सांगितलेले विज्ञानवादी तत्वज्ञानच या विश्वाला खºया अर्थाने मानवतेकडे घेऊन जाणारे आहे. ज्या राष्ट्रांनी बुध्द धम्म स्वीकारला त्या राष्ट्रांची प्रगती झालेली आहे, आणि भारत देशात बुध्दांचा जन्म होऊनही तो देश आजही अंधश्रध्दा आणि रूढी परंपरेत गुरफटलेला दिसून येतो. प्रास्ताविक प्रा.प्रदिप रोडे यांनी केले.
यावेळी भिक्खू बोधीपालो महाथेरो, भिक्खू प्रा.डॉ.एम.सत्यपाल महाथेरो, भिक्खू यशकाश्यपायन महाथेरो, भिक्खू करूणानंद थेरो, भिक्खू ज्ञानरक्षित थेरो, भिक्खू एम.धम्मज्योती थेरो, भिक्खू काश्यप थेरो, भिक्खू हर्षबोधी थेरो, भिक्खू पय्यातीस थेरो, भिक्खू महाकाश्यप थेरो, भिक्खू मुदितानंद थेरो, भिक्खू शिवली बोधी थेरो, भिक्खू धम्मदर थेरो, भिक्खू धम्मरिक्षत, भिक्खू पय्यानंद, भिक्खू शीलरत्न, भिक्खू सुभूती, भिक्खू दिपंकर, भिक्खू बोधिशील, भिक्खू संघपाल, भिक्खू नागसेनबोधी, भिक्खू संघप्रिय, भिक्खू रेवतबोधी, भिक्खू एस.नागसेनसह भन्तेंनी धम्मदेशना दिली. बौध्द धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी संयोजक भन्ते धम्मशिल यांच्यासह प्रिशदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, वर्षावास तसेच बुध्दविहार संयोजन समितीसह सर्व बौध्द उपासक-उपासिकांनी परिश्रम घेतले.
बौध्द धम्म रॅलीने वेधले लक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पंचरंगी धम्म ध्वजारोहणानंतर धार्मिक देखावे व बुध्द मुर्तींसह भिक्खु संघाची बीड शहरातून धम्म मिरवणूक काढण्यात आली होती. या बौध्द धम्म रॅलीमध्ये देशाच्या विविध राज्यातून आलेले भन्ते सामिल झाले होते. श्वेत वस्त्र परिधान करू बौध्द उपासक-उपासिका, आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने सहभागी होती.