बंकटस्वामी महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:30 AM2021-01-18T04:30:09+5:302021-01-18T04:30:09+5:30
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे, प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले या होत्या. व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून ...
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे, प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले या होत्या. व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून अशोक तागडे याप्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी ऋतुजा गायकवाड हिने स्वागत गीत सादर केले. प्रमुख वक्त्या तोकले यांनी विचार मांडताना नामांतराचा लढा शहीद झालेल्या योद्ध्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. अनेक शहीदांचे उदाहरण देऊन नामांतर लढयाचे चित्र प्रत्यक्ष डोळ्यासमोर साकार केले. तसेच डॉ. बाबासाहेबांच्या सामाजिक व शैक्षणिक बाबींचा उहापोह केला.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. मोरे यांनी जाता जात नाही ती जात अशी व्याख्या सांगून जोपर्यंत टीसी वरची जात जात नाही तोपर्यंत जात जाणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार विद्यार्थ्यांना पटवून दिले.
प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.आसिफ सय्यद, सूत्रसंचालन प्रा. छाया सोंडगे केले. आभार प्रा रवींद्र वंजारे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.