अनावश्यक बाबींची फी वसुली थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:24+5:302021-07-14T04:39:24+5:30

शिरूर कासार : आता सुरू असलेल्या सत्र ३, ५, ७ च्या नोंदणीवेळी काॅलेज प्रशासनाकडून उपभोग घेत नसलेल्या अनावश्यक बाबींची ...

Unnecessary fee collection should be stopped | अनावश्यक बाबींची फी वसुली थांबवावी

अनावश्यक बाबींची फी वसुली थांबवावी

Next

शिरूर कासार : आता सुरू असलेल्या सत्र ३, ५, ७ च्या नोंदणीवेळी काॅलेज प्रशासनाकडून उपभोग घेत नसलेल्या अनावश्यक बाबींची फी वसुली केली जात असून ही वसुली थांबवावी व विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, अशाप्रकारची मागणी कृषी पदवीधर संघटनेने कुलसचिव वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे लेखी निवेदनाद्वारे मराठवाडा उपाध्यक्ष कृष्णा बडे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे .

याबाबत निवेदनात कुलसचिवांचे लक्ष वेधले आहे. महाविद्यालय प्रशासन ग्रंथालय, जिम, वसतिगृह याबाबत फी वसुली करत आहे. वास्तविक महाविद्यालय बंद असल्याने कुठल्याही बाबींचा विद्यार्थ्यांनी उपभोग घेतला नाही शिवाय या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले बहुतांश विद्यार्थी हे शेतकरीवर्गातील आहेत. कोरोना, लाॅकडाऊनमुळे सर्वच स्तरांवर मंदीचे सावट आहे. त्यातून शेतकरीसुद्धा सुटलेला नाही आणि अशा आर्थिक टंचाईत फी वसुली करणे आणि ती देखील अनावश्यक बाबींसाठी हे संयुक्तिक वाटत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

याबाबींचा गांभीर्याने विचार करावा व फी वसुली थांबवावी, अशी आग्रही भूमिका संघटनेकडून केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमित माळी, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आवरगावे, सचिव तुषार भुतेकर तसेच उपाध्यक्ष कृष्णा बडे यांच्यासह सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Unnecessary fee collection should be stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.