असंघटित कामगारांनी श्रमिक कार्डसाठी नोंदणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:36 AM2021-08-27T04:36:45+5:302021-08-27T04:36:45+5:30

शिरूर कासार : केंद्रीय शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी असंघटित कामगारांनी श्रमिक कार्ड नोंदणी करावी, असे आवाहन भाजप अल्पसंख्याक ...

Unorganized workers should register for a labor card | असंघटित कामगारांनी श्रमिक कार्डसाठी नोंदणी करावी

असंघटित कामगारांनी श्रमिक कार्डसाठी नोंदणी करावी

Next

शिरूर कासार : केंद्रीय शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी असंघटित कामगारांनी श्रमिक कार्ड नोंदणी करावी, असे आवाहन भाजप अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष फय्याज शेख यांनी केले आहे. घरगुती काम करणाऱ्या महिला, सुतार, गवंडी, लोहार, सुरक्षाकर्मी, प्लंबर, भाजी विक्रेते अशा अनेक कामगारांसाठी श्रमिक कार्ड ही योजना आहे. या नोंदणीमुळे असंघटित कामगारांना सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे. शिवाय त्यांना ओळखपत्र दिले जाईल, ज्यावर एक युनिक नंबर असेल. असंघिटत कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल. १८ ते ५९ वयोगटातील कामगारांनी आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन फय्याज शेख यांनी केले आहे .

जिल्हा नगर प्रशासन अधिकारी नीता अंधारे यांचा सत्कार

शिरूर कासार : जिल्हा नगर पंचायत प्रशासन अधिकारी म्हणून निवड झालेल्या नीता अंधारे यांचा सत्कार शिरूर नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष रोहिदास पाटील यांनी केला. यावेळी सोबत माजी नगरसेवक गणेश भांडेकर, आनंद जावळे उपस्थित होते.

फोटो

कान्होबाची वाडीत हरिनाम सप्ताह सुरू

शिरूर कासार : तालुक्यातील कान्होबाची वाडी येथे हनुमान मूर्ती स्थापनेच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला तीन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. श्रीरंग स्वामी यांचे अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या सप्ताहात ज्ञानेश्वर महाराज जळकीकर, नागेश्वरी झाडे, माधव महाराज रसाळ, विवेकानंद शास्त्री, अविनाश महाराज शास्त्री यांची कीर्तनसेवा होत आहे. मंगळवारी श्रीरंग स्वामी यांचे काल्याचे कीर्तन होऊन सांगता होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिरूर तालुक्यात काेरोना नियंत्रणात

शिरूर कासार : तालुक्यात कोरोना महामारीच्या उद्रेकाला आताशी कुठे उतरती कळा लागली असून गुरुवारी तालुक्यात अवघा एकच रुग्ण आढळून आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. नियमांचे काटेकोर पालन केल्यास तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी वेळ लागणार नसल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

रस्त्याच्या कामाने घेतली गती

शिरूर कासार : बीड चिंचपूर हा रस्ता शिरूरमार्गे जात असून, अनेक दिवसांपासून त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आताशी कुठे या कामाने गती घेतल्याचे चित्र दिसत आहे. हे काम आणखी वेगाने करून प्रवाशांची त्रासापासून सुटका करावी, अशी मागणी केली जात आहे.

260821\img-20210826-wa0023.jpg

photo

Web Title: Unorganized workers should register for a labor card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.