बसस्थानकात अस्वच्छता; आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:29 AM2021-02-05T08:29:49+5:302021-02-05T08:29:49+5:30
बांधकाम साहित्य रस्त्यावरच अंबाजोगाई : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारे वाळू, खडी, विटा हे बांधकाम साहित्य ...
बांधकाम साहित्य रस्त्यावरच
अंबाजोगाई : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारे वाळू, खडी, विटा हे बांधकाम साहित्य सातत्याने रस्त्यावरच टाकण्यात येते. परिणामी, शहरवासियांना रस्त्यावरून ये-जा करताना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ढिगाऱ्यातील वाळू रस्त्यावर पसरत असल्याने दुचाकी व अन्य वाहने घसरत आहेत. यामुळे लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.
मेडिकल कॉलेज मार्गावर पथदिवे लावा
अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौक ते मेडिकल कॉलेज या मुख्य रस्त्यावर पथदिवे बसवावेत. हा मुख्य रस्ता रुग्णालयाकडे जाणारा असल्याने रात्रीच्या वेळीही या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अंधारामुळे गैरप्रकार उद्भवू शकतात. यामुळे मात्र नागरिकांना त्रास होऊ शकतो. यामुळे नगर परिषदेने या मार्गावर पथदिव बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. परंतु, अद्यापही या मागणीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी
बीड : शहरातील पांगरी रोड, पिंपरगव्हाण रोड या भागात मागील आठवड्यापासून सुरळीत पाणी येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपालिकेकडून याबाबत उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. पालिकेने किमान दोन दिवसांनी पाणीपुरवठा करावा, म्हणजे पाण्यासाठी भटकंती होणार नाही. अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.