धारुर तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:36 AM2021-02-20T05:36:08+5:302021-02-20T05:36:08+5:30

अवकाळी पावसाचा फटका रबीच्या पिकाला बसलेला असतानाच उसाची तोंडणी असलेल्या फडांमध्येच वाहने आडकल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. तालुक्यातील फकिरजवळ, ...

Untimely strike for the second day in a row in Dharur taluka | धारुर तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा

धारुर तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा

Next

अवकाळी पावसाचा फटका रबीच्या पिकाला बसलेला असतानाच उसाची तोंडणी असलेल्या फडांमध्येच वाहने आडकल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. तालुक्यातील फकिरजवळ, मुंगी, चिखली, कांदेवाडी, कचारवाडी, दैवठाण या गावांच्या परिसरात गाराचा पाऊस झाल्यामुळे फळ व भाजी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टरबूज, खरबूज हे पीक हातचे गेले आहेत. या बरोबरच ज्वारी, गहू, हरभरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. हे नुकसान मोठे असताना अद्याप ही प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे इदेश देण्यात आलेले नाहीत. तलाठी व कृषी सहायक यांना सूचना देत नुकसानीची प्राथमिक पाहणी करण्याच्या सूचना दिल्याचे तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी सांगीतले. उस तोडणी सुरू असलेल्या फडावर असणाऱ्या कामगाराचे मोठे हाल झाले आहेत. उसाच्या फडात वाहने आडकल्यामुळे ती वाहने बाहेर काढताना कसरत करावी लागत आहे.

चौकट,

नुकसानीची नोंद करा

तालुका कृषी अधिकारी समाधान वाघमोडे

यांनी ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकाचा विमा भरला असेत तर त्यांनी ४८ तासांच्या आत विमा कंपनीच्या ॲपवर नुकसानीची नोंद करावी, असे आवाहन केले आहे.

Web Title: Untimely strike for the second day in a row in Dharur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.