पर्यटकांच्या स्वागत नामफलकाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:11 AM2021-09-02T05:11:50+5:302021-09-02T05:11:50+5:30
नामफलक ठरतोय शहरवासीयांचे आकर्षण अंबाजोगाई : मराठवाड्याचं पुणे म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या पर्यटन अंबाजोगाई या शहरात येणाऱ्या पर्यटक व ...
नामफलक ठरतोय शहरवासीयांचे आकर्षण
अंबाजोगाई : मराठवाड्याचं पुणे म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या पर्यटन अंबाजोगाई या शहरात येणाऱ्या पर्यटक व अतिथी यांचे स्वागत करणारा आकर्षक व सुंदर असा नामफलक शहरातील यशवंतराव चव्हाण चौक येथे उभारण्यात आला आहे. हा नामफलक शहरवासीयांसाठी व पर्यटकांसाठी आकर्षण ठरला आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र काळे यांच्या मित्रमंडळाच्या वतीने या आकर्षक नामफलकाची संकल्पना राबविण्यात आली. अंबाजोगाईत येणाऱ्या अतिथी व पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी हा नामफलक उभारण्यात आला आहे. या फलकाचे अनावरण समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, डॉ. नरेंद्र काळे व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
अंबाजोगाई हे प्राचीन काळापासून ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. श्री योगेश्वरीदेवी, आद्यकवी मुकुंदराज, संतकवी दासोपंत यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. या पर्यटकांना अंबाजोगाई शहरातील सर्व ऐतिहासिक गोष्टीची सविस्तर माहिती व्हावी यासाठी सर्व माहिती असणारा अद्यावत फलकही आगामी काळात बसविण्यात येईल. - डॉ.नरेंद्र काळे, अंबाजोगाई.
310821\img-20210830-wa0037.jpg
आय लव्ह अंबाजोगाई नामफलक