आगामी नगरपरिषद शिवसेना स्वबळावर लढवणार - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:39 AM2021-09-04T04:39:45+5:302021-09-04T04:39:45+5:30

अंबाजोगाई : आगामी नगरपरिषद निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख जो आदेश देतील मग तो महाविकास आघाडीचा असेल किंवा ...

Upcoming Municipal Council Shiv Sena will fight on its own - A | आगामी नगरपरिषद शिवसेना स्वबळावर लढवणार - A

आगामी नगरपरिषद शिवसेना स्वबळावर लढवणार - A

Next

अंबाजोगाई : आगामी नगरपरिषद निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख जो आदेश देतील मग तो महाविकास आघाडीचा असेल किंवा स्वबळाचा त्याप्रमाणे निवडणुका लढण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केले. अंबाजोगाई येथे नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची आढावा बैठक सरकारी विश्रामगृहात झाली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी, रामराजे सोळंके, तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, शहरप्रमुख गजानन मुडेगावकर, जिल्हा संघटक अशोक गाढवे, लक्ष्मण सोळुंके आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आप्पासाहेब जाधव म्हणाले, आगामी निवडणुकीत अंबाजोगाईत मोठ्या प्रमाणावर आपले पदाधिकारी शिवसैनिक निवडून आणण्यासाठी सर्व गट-तट सोडून कामाला लागा. मी स्वतः या ठिकाणी ठाण मांडून बसणार असून, तन-मन-धनाने ही निवडणुकीची लढाई आपण लढणार आहोत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशहरप्रमुख गणेश जाधव, शिवकांत कदम, शहर समन्वयक अर्जुन जाधव, नागेश सावंत, उपतालुकाप्रमुख वसंत माने, नाथराव मुंडे, नागेश कुंभार, बळीतात्या गंगणे, विनोद पोखरकर, हनुमंत हावळे, विशाल कुलकर्णी, अक्षय भुमकर, समाधान पिसाळ, अभिमानी वैष्णव, प्रवीण मोरे, प्रशांत शिंदे, सुधाकर काचरे, पाटील फड यांच्यासह शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना, महिला आघाडी, ऑटो युनियनचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक गजानन मुडेगावकर यांनी केले. सूत्रसंचालन वैभव कुलकर्णी यांनी केले. अक्षय भुमकर यांनी आभार मानले.

020921\24211557-img-20210902-wa0050.jpg

शिवसेनेची अंबाजोगाई मध्ये बैठक

Web Title: Upcoming Municipal Council Shiv Sena will fight on its own - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.