वाळूच्या अवैध तस्करीसाठी बोटींचा वापर; महसूल- पोलीस पथकाने केली कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 02:24 PM2020-11-10T14:24:50+5:302020-11-10T14:25:19+5:30

निमगांव बोडखा परिसरात वाळु उपसा करणाऱ्या दोन बोटी जप्त 

Use of boats for illegal smuggling of sand; Action taken by the Revenue - police squad | वाळूच्या अवैध तस्करीसाठी बोटींचा वापर; महसूल- पोलीस पथकाने केली कारवाई 

वाळूच्या अवैध तस्करीसाठी बोटींचा वापर; महसूल- पोलीस पथकाने केली कारवाई 

Next
ठळक मुद्देतस्करीचे साडेसात लाखांचे साहित्य जप्त

कडा : वाळू माफियांनी तस्करीसाठी आता बोटींचा वापर सुरु केला असल्याचे निमगांव बोडखा परिसरात उघडकीस आले आहे. चोरट्या मार्गाने उपसा करून वाळूची बोटीच्या माध्यमातून तस्करी करत असल्याची माहिती तहसीलदार यांना मिळाली. यानंतर त्यांनी अंभोरा पोलिसांच्या मदतीने कारवाई करत साडेसात लाख रूपयाचे साहित्य जप्त केले. 

आष्टी तालुक्यातील निमगांव बोडखा परिसरात दोन बोटीच्या माध्यमातून सिना पात्रातुन वाळु उपसा होत असल्याचे तहसीलदार यांना समजताच त्यांनी अंभोरा पोलिसांच्या मदतीने सोमवारी सायकाळच्या सुमारास  कारवाई केली. यावेळी दोन बोटी व इतर साहित्य असे 7 लाख  41 हजार  रूपयाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई तहसीलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार प्रदिप  पांडुळे  अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या पथकाने केली.

Web Title: Use of boats for illegal smuggling of sand; Action taken by the Revenue - police squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.