बंधाऱ्याच्या कामात दगडगोटे, निकृष्ट साहित्याचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:33 AM2021-04-01T04:33:29+5:302021-04-01T04:33:29+5:30
आष्टी तालुक्यातील खिळद येथे नदी पुनर्जीवन सीना ‘ब’ मधून हाडोळा येथे चार बंधारे उभारण्याचे काम सुरू आहे. पण हे ...
आष्टी तालुक्यातील खिळद येथे नदी पुनर्जीवन सीना ‘ब’ मधून हाडोळा येथे चार बंधारे उभारण्याचे काम सुरू आहे. पण हे काम शासन निर्णयानुसार होत नसून मातीमिश्रीत धूळ, निकृष्ट सिमेंट, दगडगोटे टाकून व पाण्याचा अत्यल्प वापर करून काम केले जात असल्याने भविष्यात पाणी अडविण्याऐवजी पहिल्याच पाण्यात ताटातूट होऊन लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकारी व काम करीत असलेल्या गुत्तेदारांनी गावातील दोन चार लोकांना हाताशी धरून निकृष्ट कामाचा सपाटा लावला आहे. शासन निर्णयानुसार काम करावे. अन्यथा अधिकारी व गुत्तेदारांवर कारवाई करावी आणि कामाचे बिल क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून पाहणी होत नाही तोवर रक्कम अदा करू नये, अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे नितीन वाघमारे म्हणाले. याबाबत आष्टी येथील जलसंधारण विभागाचे उपअभियंता एस. ए. माळी यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, पाहणी करून चौकशी करतो. सध्या साईटवर आल्याचे सांगून फोन ठेवला.
===Photopath===
310321\nitin kmble_img-20210322-wa0017_14.jpg~310321\nitin kmble_img-20210321-wa0032_14.jpg
===Caption===
आष्टी तालुक्यातील खिळद येथे ुरू असलेल्या बंधारे कामात निकृष्ट साहित्याचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत.