उसतोड मजुरांचे आंदोलन चिघळले; मजुरांना अडवल्याप्रकरणी आ. सुरेश धस यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 04:51 PM2020-09-16T16:51:31+5:302020-09-16T17:02:25+5:30
आ. धस यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
आष्टी : उसतोड मजुरांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आ. सुरेश धस यांनी बुधवारी दुपारी शिराळ वाकी चौकात मजुरांच्या गाड्या अडवत त्यांना परत जाण्याचे आवाहन केले. यानंतर आष्टी पोलिसांनी आ. धस यांना अटक केली. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात आ. धस त्यांनी एका टॅक्टरमधून जाणाऱ्या ऊसतोड कामगारांना विनंती करून घरी पाठवले होते. त्यानंतर बुधवारी आष्टीत एका टेम्पोतून मजूर कारखान्याकडे जात असल्याचे आ.धस यांना समजले. त्यांनी मजुरांना घरी परतण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र, आ.धस यांनी आक्रमक भूमिका घेत मजुरांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आपण एकही मजूर कारखान्याकडे जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे आष्टी पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलीस ठाण्यात रियाज कलीम पठाण यांच्या फिर्यादीवरून आ. धस यांच्यावर ३४१,३४ भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ आष्टीतील खडकत चौकात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर आवाज उठवत आहोत. त्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहील.
- आ. सुरेश धस