४५५३ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर कार्यवाही करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:36 AM2020-02-18T00:36:42+5:302020-02-18T00:37:58+5:30
बीड : राज्यात वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून पात्र असतानाही पदोन्नती मिळालेली नाही. याबाबत ‘लोकमत’ने ...
बीड : राज्यात वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून पात्र असतानाही पदोन्नती मिळालेली नाही. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून हा प्रकार निदर्शनास आणला होता. यावर आरोग्य विभागाच्या संचालकांनी सर्व उपसंचालकांना पत्र काढून १५ मार्च पर्यंत राज्यातील ४ हजार ५५३ कर्मचा-यांच्या पदोन्नतीवर सर्व कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.
महाराष्ट्रात गट ड व क ची पदे मोठ्या प्रमाणात आहे. गट ड मधून क मध्ये व क मधून क मध्येच परंतु वरच्या पदावर पदोन्नतीने जाण्यास पात्र असणाºयांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. ही प्रक्रिया मागील अनेक महिन्यांपासून रखडली होती. आरोग्य विभागातील वर्ग चार ते वर्ग १ पर्यंतच्या सर्वच अधिकारी, कर्मचा-यांच्या पदोन्नतीवर ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित करून प्रकाश टाकलेला आहे. यात लातूर परिमंडळातील वर्ग तीन च्या कर्मचा-यांना ‘लोकमत’मुळे पदोन्नत्या मिळाल्या होत्या.
परंतु गट ड व क च्या कर्मचाºयांचा प्रश्न रखडला होता. यावरही प्रकाश टाकताच आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी दखल घेत राज्यातील सर्व उपसंचालकांना पत्र काढून याबाबत १५ मार्चपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे कर्मचा-यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून समाधान व्यक्त होत आहे. या कारवाईला तात्काळ सुरूवात करून पदोन्नत्या देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, २८ फेब्रुवारीला अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ५ मार्चला गोपनीय अहवाल संकलन, १० मार्चला विचार क्षेत्रातील कर्मचाºयांचा सेवा विषयक तपशील संकलित करणे, १२ मार्चला रिक्त पदांची संख्या खुला व मागास वर्ग पदसंख्या निश्चित करणे, १४ मार्चला विभागीय पदोन्नती समितीची बैठक आयोजित करणे आणि १५ मार्चला पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्याच्या सूचना पत्राद्वारे केल्या आहेत.
‘लोकमत’मुळे आरोग्य विभागाचे प्रश्न मार्गी
आरोग्य विभागातील रिक्त जागा, पदोन्नत्या याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित केलेले आहेत. याची आरोग्य विभागाने दखल घेत डॉक्टर, कर्मचाºयांची पदे भरण्यासह पदोन्नत्या केल्या आहेत. आता आरोग्य सेवा संचालकांनी राज्यातील ४ हजार ५५३ कर्मचा-यांच्या पदोन्नतीवर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्याने समाधान व्यक्त होत आहे. ‘लोकमत’चे आभारही व्यक्त केले जात आहेत.