अंबाजोगाई तालुक्यात ११ हजार १५८ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:33 AM2021-04-01T04:33:51+5:302021-04-01T04:33:51+5:30
शासनाच्या वतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. अंबाजोगाईतही या लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळू लागला ...
शासनाच्या वतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. अंबाजोगाईतही या लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. अंबाजोगाई शहरात स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व खडकपुरा येथे असलेले आरोग्य केंद्र अशा दोन ठिकाणी लसीकरण सुरू आहे. आजपर्यंत स्वा. रा. ती. रुग्णालयात ७ हजार ३०६ नागरिकांना लस देण्यास आली. खडकपुरा येथील आरोग्य केंद्रात ५७९ जणांना लस देण्यात आली. तालुक्यात ग्रामीण भागात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे राबविली जात आहे. धानोरा येथील रुग्णालयात २२६ जणांना लसीकरण करण्यात आले. तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी केले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र - लसीकरण
आपेगाव ६२२
बर्दापूर ५८५
भावठाणा ४७०
घाटनांदूर ८००
उजनी ५७२
एकूण लसीकरण ११ हजार १५८