आष्टी तालुक्यात १४८ दिव्यांगांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:37+5:302021-06-06T04:25:37+5:30

आष्टी : शनिवारी जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील दिव्यांगांसाठी राबविलेल्या विशेष लसीकरण मोहिमेत तालुक्यात १४८ दिव्यांगांचे लसीकरण झाले. येथील ग्रामीण ...

Vaccination of 148 persons with disabilities in Ashti taluka | आष्टी तालुक्यात १४८ दिव्यांगांचे लसीकरण

आष्टी तालुक्यात १४८ दिव्यांगांचे लसीकरण

Next

आष्टी : शनिवारी जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील दिव्यांगांसाठी राबविलेल्या विशेष लसीकरण मोहिमेत तालुक्यात १४८ दिव्यांगांचे लसीकरण झाले.

येथील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर दिव्यांग विशेष लसीकरण मोहिमेचे उद्घाटन राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांच्या हस्ते व वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे, डॉ. प्रसाद वाघ, दिव्यांग संघटनेचे शेषराव सानप, आण्णासाहेब साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी डाटा ऑपरेटर अशोक गाडे, प्रमोद नरुटे, सोनाजी बनकर, आजिनाथ गव्हाणे, संजय निंबाळकर यांनी दिव्यांग बांधवांची ऑनलाइन नोंद घेतली, तर आरोग्य परिचारिका बी. शेख, चौधरी यांनी लस देण्याची भूमिका बजावली. तसेच दिव्यांग शाळेतील समन्वयक विजय झांजे, सोमिनाथ करडुळे यांनी दिव्यांगांना ऑनलाइन अर्ज भरण्यास व चलनवलनास सहकार्य केले.

त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळसिंग येथील लसीकरण केंद्रावरील दिव्यांग लाभार्थ्यांचे स्वागत करून अल्पोपहार वाटप करण्यात आला. तसेच शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळसिंग परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आष्टी पंचायत समितीचे सभापती बद्रीनाथ जगताप, दिव्यांग संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड, शेषराव सानप, ग्रामविस्तार अधिकारी नवनाथ लोंढे, टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद वाघ, समन्वयक सुधीर शिंदे, शिवाजी रणसिंग व कर्मचारी उपस्थित होते.

आष्टी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे २२, प्राथमिक आरोग्य केंद्र कडा ४४, खुंटेफळ ४१, टाकळसिंग ४, सुलेमान देवळा २०, धामणगाव १७ असे एकूण १४८ दिव्यांग बांधवांनी विशेष लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवून लस घेतली. यासाठी तालुक्यातील सर्व आरोग्य अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी, दिव्यांग शाळेतील सर्व केंद्रनिहाय समन्वयक यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

===Photopath===

050621\img-20210605-wa0597_14.jpg

Web Title: Vaccination of 148 persons with disabilities in Ashti taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.