धारूर तालुक्यात एकाच दिवशी १९६६ जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:35 AM2021-05-07T04:35:46+5:302021-05-07T04:35:46+5:30

धारूर : तालुक्यात गुरूवारी कोविड प्रतिबंधक लसीकरणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दिवसभरात १९६६ जणांचे लसीकरण झाले. धारूर ...

Vaccination of 1966 persons on the same day in Dharur taluka | धारूर तालुक्यात एकाच दिवशी १९६६ जणांचे लसीकरण

धारूर तालुक्यात एकाच दिवशी १९६६ जणांचे लसीकरण

Next

धारूर

: तालुक्यात गुरूवारी कोविड प्रतिबंधक लसीकरणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दिवसभरात १९६६ जणांचे लसीकरण झाले. धारूर शहरात ४२१ तर तर ग्रामीण भागात १५४५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मात्र आरोग्य विभागाच्या आॉनलाइन मधील चुकीच्या नियोजनामुळे शहरात लसीकरणावेळी गोंधळ उडाला. अनेकांना आॉनलाईन नोंद करून वेळ व तारख न मिळाल्याने लस न घेताच परतावे लागले. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य विभागाची त्रेधातिरपीट झाली.

शहरातील नागरिकांसाठी येथील ग्रामीण रुग्णालयाने नगरेश्वर मंगल कार्यालयात या मध्यवर्ती ठिकाणी गुरूवारी लसीकरण ठेवले होते. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहीला डोस तर ४५ वया पुढील नागरिकांना कोव्हिशिल्डचा पहिला व दुसरा डोस देण्याची सोय करण्यात आली होती. यासाठी नोंद आॕनलाईन असणे बंधनकारक होते. लसीकरणासाठी जेष्ठ नागरिक तसेच व महिलांची गर्दी झाली होती. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध नसल्याने हि लस मात्र देण्यात आली नाही. १८ ते ४५ वयोगटात आॕॅनलाईन नोंद पुर्ण प्रक्रिया न झालेल्या नागरिकांना लस न घेता परतण्याची पाळी आली. आरोग्य विभागाच्या आॕनलाईन नियोजनात प्रत्येक तालूक्यला वेगळा निकष व चुकीचे नियोजन यामुळे सर्वसामान्यांना मात्र लसीकरणावेळी त्रास सहन करावा लागला. गुरूवारी शहरात कोव्हिशिल्डचे ३३० तर तर कोव्हॅक्सिनचे ९१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

धारूर येथील लसीकरण केंद्रावर नियोजनासाठी तहसीलदार वंदन शिडोळकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने, तालुका आरोग्य अधिकारी डाॕॅ. स्वाती डिसले, सहायक पोलीस निरीक्षक कानीफनाथ पालवे स्वतः ठाण मांडून होते. तालुक्यात मोहखेड, भोगलवाडी आणि रुईधारूर येथे लसीकरण झाले.

वसुंधरा मंडळाचे सहकार्य

प्रशासन व नागरीकाना वसुंधरा मित्रमंडळाच्या वतीने सहकार्य

करण्यात आले. कोरोना लसीकरणा साठी होणारी गर्दी टाळण्यासाठी मंडळाने प्रयत्न केले. नागरिकांना लसीकरणासाठी आॕॅनलाईन नोंदणी करून देण्याचे काम करत आरोग्य विभागाला सहकार्य करण्यात आले.

===Photopath===

060521\img_20210506_105953_14.jpg

Web Title: Vaccination of 1966 persons on the same day in Dharur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.