कोळपिंप्री येथे २५० ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:35 AM2021-05-08T04:35:48+5:302021-05-08T04:35:48+5:30
रुईधारूर आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोळपिंप्री येथे कोविड लसीकरण कॅम्प घेण्यात आला. यामध्ये ४५ वर्षांपुढील २५० ...
रुईधारूर आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोळपिंप्री येथे कोविड लसीकरण कॅम्प घेण्यात आला. यामध्ये ४५ वर्षांपुढील २५० नागरिकांना लस देण्यात आली. यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी अभिजित वाघमारे, गुन्नाल दीक्षित, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मोबाईलवरील ऑनलाईनसाठी बबलू बुरसे यांनी मेहनत घेतली. तसेच लसीकरण कॅम्प यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य केले. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने लसीकरणाचे योग्य नियोजन केले होते. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची थर्मल गन व ऑक्सिमीटरद्वारे तापमान व ऑक्सिजन तपासूनच नोंद केली जात होती. सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर वापरत व सामाजिक अंतर ठेवून शिस्तबद्धपणे शांततेत लस घेतली. गावातच लस मिळाल्यामुळे लोकांची सोय झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
लसीकरण कॅम्पचे उद्घाटन सरपंच विजयकुमार खुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच रावसाहेब सोळंके, प्रभाकर आलाट, सुरेश सोळंके, धर्मराज बुरसे ग्रामस्थ उपस्थित होते.
===Photopath===
070521\anil mhajan_img-20210507-wa0044_14.jpg