पाच गावात आज कोविडचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:39 AM2021-09-15T04:39:14+5:302021-09-15T04:39:14+5:30
... भिजलेल्या शेतीमालाला पालखी महामार्गाचा आधार शिरूर कासार : झालेल्या पावसामुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु शेतकऱ्यांनी काढणी ...
...
भिजलेल्या शेतीमालाला पालखी महामार्गाचा आधार
शिरूर कासार : झालेल्या पावसामुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतीमाल पाण्यातून कसाबसा बाहेर घेतला. तो माल पालखी महामार्गावर आणून वाळत घातल्याचे चित्र खोलेवाडी, कारेगाव, राक्षसभुवन आदी गावात दिसून येत आहे. शेतीमाल सुकविण्यासाठी पालखी मार्ग आधार ठरला आहे.
...
राक्षसभुवन येथील पुलाची दुरवस्था
शिरूर कासार : तालुक्यातील राक्षसभुवन येथून पुढे जाणाऱ्या कापरी नदीवरील पुलावरून मोठ्या पुराचे पाणी गेल्याने पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलावरच मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहन चालकास मोठी कसरत करावी लागत आहे. तरी या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे.
...
गौरी विसर्जनानंतर आता वेध पितृपक्षाचे
शिरूर कासार : पोळा सणानंतर गणेशोत्सव नंतर महालक्ष्मी हे सण साजरे होतात. पोळा, महालक्ष्मी सण उत्साहात साजरा झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सध्या गणेशोत्सवाची धूम सध्या जोरात सुरू आहे.
..
डोंगरबारीत सीताफळांच्या झाडांना आला बहर
शिरूर कासार : तालुक्यात पावसाळा चांगला झाल्याने डोंगरबारीत रानमेवा समजल्या जाणाऱ्या सीताफळाच्या झाडांना चांगला बहर आल्याचे दिसून येत आहे. हेच सीताफळ डोंगरी भागातील एक उत्पन्नाचे साधन देखील मानले जाते. डोळे उघडलेली सीताफळ तोडून अगदी रोडवर विक्रीसाठी दिसून येत असतात. या सीताफळांना पुणे, मुंबई येथे मोठी मागणी असते.
...
तलाव जवळ मुक्त मृग संचार
शिरूर कासार : एरव्ही पाण्यासाठी भटकंती कराव्या लागणाऱ्या वन्यजीवांना आता पावसामुळे जागोजागी काळ्याभोर पाण्याचे तलाव दिसत आहे. परिसरात हिरवीगार डोंगर, दरी ही असल्याने चाऱ्याचा प्रश्नही मिटला आहे. यामुळे या परिसरात हरणांची कळप दिसून येत आहेत. मोर आणि हरणांच्या आनंदाला उधाण आले आहे.
...