बर्दापूर आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:29 AM2021-03-15T04:29:51+5:302021-03-15T04:29:51+5:30
गेवराई ते सिंदखेड रस्ता खराब बीड : गेवराई ते सिंदखेड रस्ता खराब झाला आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत, तर ...
गेवराई ते सिंदखेड रस्ता खराब
बीड : गेवराई ते सिंदखेड रस्ता खराब झाला आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत, तर दुतर्फा बाजूंनी बाभळीचा विळखा पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शहरातील मोंढा भागातून गोविंदवाडी, सिंदखेडसह पुढे रस्ता जात असून, रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गोविंदवाडी, मन्यारवाडी वस्ती, सिंदखेड, सुशी वडगाव, जव्हारवाडी, मानमोडी, मोरे वस्ती विविध तांडेसह इतर गावांतील नागरिकांना या समस्येमुळे अडचणी येत आहेत.
श्रीसंत भगवानबाबा विद्यालयास भेट
बीड : गेवराई तालुक्यातील जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव येथील श्रीसंत भगवानबाबा मा. विद्यालयास बीड जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी राजपूत यांनी भेट दिली. यावेळी राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. राजपूत यांनी शाळेच्या कामकाजाविषयी माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक बापूराव घुले, भागवत सोळुंके, अंजली माने, मुक्ता मोटे, मयूर येवलेकर, नवनाथ घुगे, वर्षा कांडेकर, योगेश म्हैसनवाड, प्रसाद कुलकर्णी, आदींची उपस्थिती होती.
‘रखडलेली रस्ता कामे पूर्ण करा’
बीड : शहरातील अनेक भागात रस्ता अटल अमृत योजनेतील कामे, नळ जोडण्याची कामे अपूर्ण स्थितीत असून, याचा सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. पालिका प्रशासनाने ही कामे तत्काळ पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. पालिकेने शहरात विविध विकासकामे हाती घेतली आहेत. मात्र, यातील अटल अमृत योजनेतील काही कामे प्रलंबित आहेत. अद्याप काही भागात नळ जोडणींची कामे झालेली नाहीत. ही कामे गतीने करावीत, जेणेकरून नागरिकांना याचा त्रास होणार नाही, अशी मागणी होत आहे.