परळी तालुक्यात तीन दिवसांपासून लसीकरण थांबले -
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:42 AM2021-04-30T04:42:52+5:302021-04-30T04:42:52+5:30
सोमवारपर्यंत परळी तालुक्यातील २४ हजार ५०० नागरिकांना लस देण्यात आली. परळी तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य ...
सोमवारपर्यंत परळी तालुक्यातील २४ हजार ५०० नागरिकांना लस देण्यात आली.
परळी तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरातील खंडोबा मंदिर परिसरातील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य विभागाच्या वतीने लस देण्यात येत आहे. परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात यापूर्वी शहरातील नागरिकांना लस देण्यात आली; परंतु गेल्या आठ दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालयात न देता खंडोबा मंदिर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येत आहे. या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाण्याचा रस्ता व्यवस्थित नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नगरपरिषदेने हा रस्ता व्यवस्थित करावा, अशी मागणी सामजिक कार्यकर्ते अतुल तांदळे यांनी केली आहे.
परळी शहरात एकाच ठिकाणी लसीकरणाची सध्या सोय आहे. शहरासाठी कोरोना प्रतिबंधक लस साठा वाढून लस केंद्र वाढवावेत. -
डॉ. शालिनी कराड, परळी.
परळी शहर व परिसरात लसीकरण केंद्र वाढवावे. ग्रामीण भागात अधिक लक्ष दिले पाहिजे.
- प्रकाश चव्हाण, माकप.
परळी तालुक्यात मंगळवारी लस संपल्याने पुन्हा लससाठा मिळावा, अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे. लस साठा उपलब्ध होताच नागरिकांना लस देण्यात येतील. - डॉ. लक्ष्मण मोरे, तालुका आरोग्य अधिकारी परळी.