आठ दिवसांनंतर लस आली; आरोग्य केंद्रात गर्दी उसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:33 AM2021-04-16T04:33:59+5:302021-04-16T04:33:59+5:30
शिरूर कासार : सुरुवातीला लस घ्या, असे वारंवार आवाहन करावे लागत होते तरीदेखील नागरिक भीतीपोटी लस घेणे टाळत होते. ...
शिरूर कासार : सुरुवातीला लस घ्या, असे वारंवार आवाहन करावे लागत होते तरीदेखील नागरिक भीतीपोटी लस घेणे टाळत होते. मात्र, लस घेतल्यानंतर त्रास होत नाही, याची आता खातरजमा झाल्याने आवाहन न करताही लस घेण्यासाठी गुरुवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी उसळली होती. मध्यंतरी आठ दिवस लसीचा तुटवडा होता, लस आल्याचे समजताच मला मिळाली पाहिजे, यासाठी सकाळपासून दवाखान्यात गर्दी झाली होती.
कोरोना नियमावलीला पायदळी तुडवले जात असल्याचे स्पष्ट दिसून आले. शेवटी तहसीलदार श्रीराम बेंडे हे आरोग्य के़द्रावर पोहोचले आणि गर्दीला आवर घातला.
मध्यंतरी लस शिल्लकच नव्हती.
लसीचा तुटवडा
सर्वव्यापी बातम्या ऐकत असताना गुरुवारी ५०० लस प्राप्त झाल्या. त्यात २०० खालापुरी आरोग्य केंद्रात व ३०० शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लाभार्थ्यांना देण्यात आली. मला लस मिळाली पाहिजे, या भावनेतून सकाळपासून गर्दी झाली होती. अंतर ठेवा, मास्क लावा, शांतता पाळा या सर्व आरोग्य विभागाच्या सूचना पायदळी तुडवल्या जात होत्या. या सर्व बाबींकडे अखेर दुर्लक्ष करत लसीकरणाचे काम सुरू ठेवावे लागले.
जसजशी लस उपलब्ध होईल, तशी ती देण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता लस घ्या,घाबरू नका. परंतु, गाफील राहू नका असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केले.