वहाली गावाने घडविले माणुसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:35 AM2021-05-06T04:35:43+5:302021-05-06T04:35:43+5:30

कुसळंब : कोरोनामुळे संकटात सापडलेल्या गावच्या सुपुत्रासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत सव्वा लाखांचा निधी जमविला. जमा केलेल्या या आर्थिक मदतीतून ...

Vahali village created a vision of humanity | वहाली गावाने घडविले माणुसकीचे दर्शन

वहाली गावाने घडविले माणुसकीचे दर्शन

Next

कुसळंब : कोरोनामुळे संकटात सापडलेल्या गावच्या सुपुत्रासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत सव्वा लाखांचा निधी जमविला. जमा केलेल्या या आर्थिक मदतीतून वैभव चंद्रकांत तांबरे हा कोरोनाच्या आजारातून मुक्त झाला. त्यानंतर गावात वैभवचे आगमन होताच ग्रामस्थांनी स्वागत केले. ग्रामस्थांनी माणुसकीचे दर्शन दाखवीत गाव करी ते राव काय करी? याची प्रचिती वहालीकरांनी आणून दिली.

पाटोदा तालुक्यातील वहाली गावातील तरुण वैभव चंद्रकांत तांबरे हा कोरोना संक्रमित झाल्याने जामखेड येथील रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले होते. त्याचा स्कोअर पंधराच्या पुढे गेल्याने त्याला त्रास सुरू झाला. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आणि महागड्या इंजेक्शन व औषधांची गरज लक्षात घेत ग्रामस्थांनी आपापल्या परीने वैभवला मदत करण्याचा प्रयत्न केला. वहाली गावाच्या नावाने काढलेल्या ग्रुपच्या माध्यमातून कोरोनानिधी जमा करण्याचे आवाहन करताच मधुकर तांबरे, विष्णू घुमरे यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेत लाखाच्या वर निधी जमा केला. हा निधी वैभवच्या उपचारासाठी कामी आला. गावकऱ्यांनी केलेला हा छोटासा प्रयत्न भविष्यात गावाच्या विकासासाठी, भरभराटीसाठी व वैभवासाठी, माणसांतील मतभेद-जातिभेद विसरायला लावणारा असेल यात मात्र तीळमात्र शंका नाही.

===Photopath===

050521\anil gaykwad_img-20210504-wa0002_14.jpg

Web Title: Vahali village created a vision of humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.