परळीचे वैद्यनाथ मंदिर भाविकांसाठी खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:32 AM2021-04-06T04:32:10+5:302021-04-06T04:32:10+5:30
परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले येथील वैद्यनाथ मंदिर भाविकांसाठी सोमवारपासून खुले करण्यात आले आहे. कोरोनाविषयक ...
परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले येथील वैद्यनाथ मंदिर भाविकांसाठी सोमवारपासून खुले करण्यात आले आहे. कोरोनाविषयक नियम व अटींचे पालन करून भाविकांनी आज प्रभू श्री वैद्यनाथाचे दर्शन घेतले. हे मंदिर सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येत आहे. तब्बल एक महिन्यानंतर सोमवारी भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता आले. दर्शनाच्या लाभामुळे आनंद वाटला. मंदिर रोडवर वर्दळ दिसून आली असे मनोज रामदासी व संतोष घुमरे यांनी सांगितले.
४ एप्रिल रोजी एका आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क आणि सॅनिटायझर तसेच तापमापी व इतर साथरोग प्रतिबंधात्मक उपयायोजनेच्या अटी आणि शर्थींचे पालन करून पाच एप्रिलपासून भाविकांना श्री वैद्यनाथ मंदिर सकाळी ७ते दुपारी १२ वाजेपर्यंत खुले करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारपासून मंदिर पाच तास खुले करण्यात आले. तसेच या परिसरातील श्री दक्षिणमुखी गणपती मंदिर, संत जगमित्र नागा मंदिर ही उघडण्यात आले आहे. दरम्यान मंदिर भाविकांसाठी खुले केल्याने संत साहित्याचे संशोधक ह.भ.प. ॲड. दत्ता महाराज आंधळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
===Photopath===
050421\img20210405102729_14.jpg~050421\img20210405102242_14.jpg